औरंगाबाद विभागीय आयुक्तांच्या बंगल्यात कचऱ्याला आग 

आग
आग

औरंगाबाद - विभागीय आयुक्तांच्या बंगल्यात भिंतीजवळ कचऱ्याला आग लागल्याची घटना सोमवारी (ता. 28) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. यानंतर दोन बंबांद्वारे अग्निशामक दलाच्या जवानांनी पंधरा ते वीस मिनिटांत आग विझविली. ही आग लागली की लावली, याबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला. 


अग्निशामक दलाकडून प्राप्त माहितीनुसार विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ कचरा साचलेला होता. हा कचरा सायंकाळी साडेपाच वाजता पेटला. पाहता पाहता धुरळा झाल्याने घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाचा एक बंब जवानांसह पाचारण करण्यात आला; परंतु पाणी संपल्याने पुन्हा दुसरा बंब मागवण्यात आला. अग्निशामक दलाचे प्रभारी अब्दुल अजीज व एल. एम. गायकवाड यांच्या पथकांनी आग पंधरा ते वीस मिनिटांत आटोक्‍यात आणली. आग कशाने लागली ही बाब गुलदस्त्यात असून सिगारेट पिऊन गेटकडे फेकल्याने आग लागल्याची चर्चा समोर आली आहे. परंतु कचरा पेटवल्याचीही चर्चा आहे. 

आग पोचली आयुक्तांपर्यंत 
शहरात साचलेला कचरा व त्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न गंभीर बनला होता. गतवर्षात यासाठी आंदोलने आणि हिंसाचारही घडला होता. शहरात जागोजाग कचऱ्याला आग लावण्यात आली. यात वाहनांसह घर पेटल्याचेही प्रकार घडले. महापालिका कर्मचाऱ्यांनीही आग लावल्याचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध झाले. शहरातील आग महापालिका ते मुंबईतही गाजली. हीच आग आता आयुक्तांच्या बंगल्यापर्यंत पोचली. 
  
रविवार बाजारातही आग  
शहरातील रविवार बाजार, हनुमान मंदिर परिसरातही कचऱ्याला आग लागल्याची घटना सव्वाअकरानंतर घडली. ही बाब समजताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोचून आग विझविली. 


  
साचलेल्या कचऱ्याला लागणाऱ्या आगी लागतात की लावल्या जातात, याचा शोध घ्यावा लागेल. अनेक आगी या खोडसाळपणाने लावल्या जात आहेत. 
- नंदकुमार घोडेले, महापौर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com