माहूरमध्ये गोदामाला भीषण आग

बालाजी कोंडे
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

माहूर : माहूर शहरात आबासाहेब पारवेकर मार्केटच्या बाजूला असलेल्या खुर्चीच्या गोदामाला शुक्रवारी (ता. 16) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत खुर्ची, गादी व ईतर फायबरचे सामान जळून खाक झाले. साठ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

माहूर : माहूर शहरात आबासाहेब पारवेकर मार्केटच्या बाजूला असलेल्या खुर्चीच्या गोदामाला शुक्रवारी (ता. 16) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत खुर्ची, गादी व ईतर फायबरचे सामान जळून खाक झाले. साठ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांचे लहान बंधू जुनेद दोसाणी यांचा माहेर इंटरप्रायजेस या नावाने खुर्चीचा व्यवसाय आहे. त्यांचे शहरातील आबासाहेब पारवेकर मार्केट शेजारी खुर्चीचे गोदाम आहे. या गोदामास शुक्रवारी (ता.16) सकाळी आठ वाजताचे दरम्यान भीषण आग लागली. आग एवढी भीषण होती की माहूर, किनवट, पुसद, उमरखेड येथील अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग तीन तासात विझवली. या आगीत हजारो फायबर खुर्ची, टेबल, गादी व इतर साहित्य जळुन खाक झाले.            

घटनेची माहिती मिळताच आमदार प्रदीप नाईक, तहसीलदार सिध्देश्वर वरणगावकर, नांदेड जि.प. चे उपाध्यक्ष समाधान जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, मुख्याधिकारी विद्या कदम, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, गटविकास अधिकारी विशालसिंह चौहाण, बाजार समितीचे सभापती दत्तराव मोहीते,पं.स. चे माजी सभापती मारोती रेकुलवार, उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मेघराज जाधव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे, विनोद राठोड, गटनेते रहेमतअली, अधिक्षक वैजनाथ स्वामी, नगरसेवक दीपक कांबळे,ईलीयास बावाणी, शिवसेनेचे शहरप्रमुख निरधारी जाधव यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.आग विझविण्याकरिता शहरातील नागरिकांनी मोठे प्रयत्न केले.आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire at Godown in Mahur