हिंगोलीत कपड्याच्या दुकानाला भीषण आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

या आगीमध्ये सुमारे दोन ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे आगीचे नेमके कारण समजु शकली नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हिंगोली : शहरातील महात्मा गांधी चौकातील कस्तुरी रेडिमेड या कपड्याच्या दुकानाला रविवारी ( ता. १३ ) मध्यरात्री  अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. याआगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

शहरातील महात्मा गांधी चौक प्रणव दोडल यांचे कस्तुरी रेडीमेड कपडे दुकान आहे.  दोन मजली असलेल्या या दुकानाला रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली. दुकानातून धूर व आग निघत असल्याचे  दिसताच नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.  आग विझवण्यासाठी हिंगोली व कळमनूरी पालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीचे रौद्र रूप लक्षात घेता खासगी कंत्राटदारांचे दहा ते पंधरा टँकर बोलवण्यात आले होते. शेकडो नागरीक व अग्नीशमन दल यांच्या प्रयत्नाने तब्बल चार तासानंतर आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व कपडे व इतर साहित्य जळुन खाक झाले होते.

या आगीमध्ये सुमारे दोन ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे आगीचे नेमके कारण समजु शकली नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी आमदार तान्हाजी मूटकूळे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्यासह पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: fire in Hingoli