औरंगाबादेतील माणिक रुग्णालयाला भीषण आग

मनोज साखरे 
सोमवार, 2 एप्रिल 2018

आगीची माहिती मिळता आतमध्ये असलेले कर्मचारी, पेशंटचे नातेवाईक व पेशंट वरच्या मजल्यावर पळत सुटले. वरच्या मजल्यावरील खिडकीतून 30 ते 35 जणांना सुखरुप बाहेर काढले असून यात दोन किडनी विकारांचे पेशंट, दोन लहान मुले व 15 ते 20 रुग्णांलयातील कर्मचाऱ्यांचा या समावेश आहे. अद्याप कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

औरंगाबाद : शहरातील प्रसिद्ध जवाहरनगर पोलिस स्टेशनच्या जवळील माणिक रुग्णालयाच्या तळ मजल्याला सोमवारी (ता.2) सकाळी साडे अकरा वाजता भीषण आग लागली. यामुळे हॉस्पिटलमध्ये धुराचे लोळ पसरल्याने आतमध्ये असलेल्या सर्वांना श्‍वसनाचा त्रास जाणू लागला होता.

आगीची माहिती मिळता आतमध्ये असलेले कर्मचारी, पेशंटचे नातेवाईक व पेशंट वरच्या मजल्यावर पळत सुटले. वरच्या मजल्यावरील खिडकीतून 30 ते 35 जणांना सुखरुप बाहेर काढले असून यात दोन किडनी विकारांचे पेशंट, दोन लहान मुले व 15 ते 20 रुग्णांलयातील कर्मचाऱ्यांचा या समावेश आहे. अद्याप कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्‍यात आणण्याच प्रयत्न सुरु आहे. जे आगीच्या ठिकाणी अडकले आहे त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु होते. हॉस्पीटलच्या भिंतींना मोठ्या सिडी लावुन आतील सर्व जणांना अग्नीशामक दलाने बाहेर काढले तसेच येथील सर्व सिलेंडर सुद्धा बाहेर काढण्यात आले आहे.

Web Title: fire in hospital Aurangabad