माहूरगडावरिल श्री दत्त शिखर मंदिराच्या गोदामाला आग 

बालाजी कोंडे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

माहूर - माहूर गडावरिल श्री दत्त शिखर संस्थानच्या गोदामाला शुक्रवारी (ता.24) पहाटे चार ते साडेचार वाजताचे दरम्यान, भिषण आग लागली. आगीत मोठे नुकसान झाले आहे.  भिषण आग लागल्याची माहिती मिळताच माहूर, किनवट, उमरखेड, पुसद येथील अग्नीशामक वाहनांनी शर्थीचे प्रयत्न करून पाच तासात आग आटोक्यात आणली. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.  

घटनेची माहिती मिळताच तहसिलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, मुख्याधिकारी विद्या कदम, पोलीस निरिक्षक लक्ष्मण राख, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी भेट देऊन पाहणी केली माहीती घेतली.  

आग विझविण्याकरिता नायब तहसिलदार यु.एन. कागने, पुजारी वासुदेव भारती महाराज, विश्वस्त प्रा. गणेश पाटील, विश्वस्त विश्वास माने, विश्वस्त गोपाल भारती, विश्वस्त अॅड. निलेश पावडे, सह व्यवस्थापक सदर्शन देशमुख, भागवत मस्के, यशवंत जाधव यांच्यासह नागरिक, भाविक, सस्थानचे कर्मचारी यांनी शर्थीचे प्रयत्न केले. श्री रेणुकादेवी संस्थानचे सुरक्षारक्षक, न.प. चे कर्मचारी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. माहर येथील ग्रामीण रुग्णालयाची 108, व श्री रेणुकादेवी संस्थानची रूग्नवाहिका घटणास्थळी आपत्कालीन स्थिती करिता हजर ठेवण्यात आल्या होत्या.  

Web Title: A fire in mahur Shri Dutt Shikhar temple godown