परभणी बसस्थानकातील एसटी बसने घेतला पेट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मे 2019

परभणी बसस्थानकात आग विझविण्यासाठी कुठलीही यंत्रणा उपलब्ध नसल्याचे दुर्दैवी चित्र आज समोर आले. पेट घेतल्यानंतर आरडा-ओरड झाल्यानंतर आग विझविण्यासाठी प्रयत्न झाल्याचे दिसून आले. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. मात्र, शेकडो प्रवाशी घेऊन जाणाऱ्या एसटीत अग्नीशमन यंत्रणा गरजेची असल्याचा सूर प्रवाशातून व्यक्त होत होता.

परभणी : प्रवाशांनी भरलेलया एसटी बसने मंगळवारी (ता.28) सकाळी अचानक पेट घेतल्याने एसटी बसस्थानकात मोठा गोंधळ उडाला.

दरम्यान, अग्नीशमन दलाने तातडीने धाव घेत आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. मंगळवारी (ता.28) सकाळी बीडहून किनवटकडे (जि.नांदेड) जाणारी (एमएच20 बीएल 1906) एसटी बस सकाळी साडेआठच्या सुमारास बसस्थानकात दाखल झाली. एसटीबस प्रवाश्यांनी भरलेली होती. बस स्थानकात दाखल होताच वसमत, नांदेडकडे जाणारे प्रवाशी एसटीमध्ये बसण्यासाठी चढू लागले होते. तर आतील काही प्रवाशी खाली उतरू लागले.

एसटीचे चालक व वाहक दोघेही खाली उतरले होते. तेवढ्यातच एसटबसच्या इंजीनने अचानक पेट घेतला. चालकाच्या कॅबीनमधून धूर येत असल्याने आतील प्रवाशांनी ओरड सुरू केली. त्याचबरोबर स्थानकातील फलाटावरील प्रवाशांनीही ओरड सुरू केली. एसटीने पेट घेतल्याने नियंत्रण कक्षाच्या लक्षात येताच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्नीशमन दलास पाचारण केले. अग्नीशमल दलाच्या गाडीने येत पाण्याचा मारा करीत आग विझवली. मात्र, तोपर्यंत कॅबीनमधील सर्व साहित्य खाक झाले होते. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हाणी झाली नाही. दरम्यान, शॉटसर्किट झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

परभणी बसस्थानकात आग विझविण्यासाठी कुठलीही यंत्रणा उपलब्ध नसल्याचे दुर्दैवी चित्र आज समोर आले. पेट घेतल्यानंतर आरडा-ओरड झाल्यानंतर आग विझविण्यासाठी प्रयत्न झाल्याचे दिसून आले. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. मात्र, शेकडो प्रवाशी घेऊन जाणाऱ्या एसटीत अग्नीशमन यंत्रणा गरजेची असल्याचा सूर प्रवाशातून व्यक्त होत होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire on st bus in Parbhani