हिंगोलीत भाजी मंडईत दुकानाला आग, लाखो रुपयांचे नुकसान

file photo
file photo

हिंगोली : शहरातील गांधी चौकाजवळ असलेल्या भाजी मंडईत रविवारी ( ता. १७) रात्री ९.२० वाजण्याच्या सुमारास तीन ते चार दुकानांना लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून भस्मसात झाली आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीमुळे परिसरातील इतरही दुकानांचे नुकसान झाले आहे.

अग्निशामक दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली. हिंगोली शहरातील भाजी मंडई भागात रात्री ९ २० वाजण्याच्या सुमारास एका दुकानातून अचानक धूर निघू लागला. नंतर आगीचे गोळे बाहेर पडत होते. आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचा भडका उडाल्याने या आगीची झळ परिसरातील इतर दुकानांना बसली. आग लागल्याचे  समजतात हिंगोली पालिकेची अग्निशामक दल तसेच कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.  

घटनास्थळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांच्यासह पालिकेचे कर्मचारी यांच्यासह अग्निशामक दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर कळमनुरी येथील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. आगीच्या घटनेनंतर घटनास्थळी मोठा जमाव एकत्र आला. या जमावाने परिसरातील दुकानातील साहित्य काढून टाकण्यास मदत केली. त्यामुळे इतर दुकानांचे मोठे नुकसान झाले नाही. या आगीमध्ये रफिक अडत दुकान तसेच जमील तांबोळी व कलीम तांबोळी यांच्या कटलरी व स्टेशनरी तसेच मसाला साहित्याचे हे नुकसान झाले. यात तीन दुकानाचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. या दुकानाच्या आगीने इतरही दुकानाचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण मात्र कळु शकले नाही.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com