व्हिडिओकॉन कारखान्यात आग 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

चितेगाव : चितेगाव (ता. पैठण) येथील व्हिडिओकॉन उद्योग समूहातील रेफ्रिजरेटर विभागातील स्क्रॅप मटेरियलला अचानक आग लागून, त्यात मोठे नुकसान झाले. ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. यात जीवित हानी झाली नाही, कोणी जखमी झाले नाही, त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

औरंगाबाद-पैठण रस्त्यावर चितेगाव येथे व्हिडिओकॉन उद्योग समहूाचे अनेक युनिट असून, यातील रेफ्रेजरेटर विभागातील क्रॅप मटेरियलला दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागल्याचे येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात आले. त्यांनी कारखान्यातील अग्निशमन विभाग व वरिष्ठ कार्यालयास माहिती दिली. दुपारची वेळ, वाढते तापमान यामुळे आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केले. धुरामुळे परिसरात काळोख पसरला होता. 

Web Title: Fire in Videocon Factory