नांदेडमध्ये पुन्हा व्यापाऱ्यावर गोळीबार

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

नांदेड : मागील महिण्यात शहरातील एका बार मालकावर गोळीबार करून शहरात खळबळ उडवून दिली होती. ही घटना ताजी असतांनाच मंगळवारी (ता. 4) रात्री पुन्हा एका व्यापाऱ्यावर रात्री गोळीबार झाल्याने नांदेड पोलिसांचे धाबे दणाणले. घटनास्थळावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पहाणी केली. जखमी आशिष रमेश पाटणी याच्यावर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

गुरूकृपा मार्केट मधील आपले हार्डवेअरचे दुकान बंद करून आशिष पाटणी हे रात्री जुना मोंढा भागात असलेल्या आपल्या निवासस्थानी दुचाकी (एसएच२६-एक्यु-४१०८) वरून जात होते. हनुमान टेकडी परिसरात पोहचताच पाठीमागुन आलेल्या एका दुचाकीवरील हल्लेखोरांनी आशिष पाटणीवर गोळीबार केला. यात त्यांच्या डाव्या पायाला तीन गोळ्या लागल्याने ते काही अंतरावर जाऊन बेशुध्द पडला. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले. हल्लेखोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून पोलिस तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलिस अधिक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, पोलिस उपाधिक्षक (शहर) अभिजीत फस्के, पोलिस निरीक्षक संदीप शिवले, द्वारकादास चिखलीकर, एपीआय विनोद दिघोरे यांच्यासह आदी पोलिस अधिकारी हजर झाले.

रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी नाकाबंदी लावून हल्लेखोरांना पकडण्यासाठी विविध पथके तैणात केली आहे. या घटनेमुळे पुन्हा शहरातील नागरीक, व्यापारी भायभीत झाले आहेत. पोलिसांचा वचक कमी झाल्याने असे प्रकार घडत असल्याचे काही सुज्ञ नागरिक बोलून दाखवत आ

Web Title: firing on businessman at nanded