आश्चर्यच! औरंगाबादमध्ये भर रस्त्यात मासेमारी, पाहा VIDEO

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 October 2019

औरंगाबाद - महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टाऊन हॉल येथील उड्डाणपुलाखाली पाण्याचे तळे कायम आहे. येथे कमल तलावातून ड्रेनेजमिश्रीत पाणी व त्यासोबत मासेही वाहून येत आहेत. हे मासे पकडण्यासाठी लहानमुले दिवसभर गर्दी करत आहेत; तर पाण्यामुळे वाहनचालक त्रस्त असून, छोटे-मोठे अपघातही होत आहेत. 

औरंगाबाद - महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टाऊन हॉल येथील उड्डाणपुलाखाली पाण्याचे तळे कायम आहे. येथे कमल तलावातून ड्रेनेजमिश्रीत पाणी व त्यासोबत मासेही वाहून येत आहेत. हे मासे पकडण्यासाठी लहानमुले दिवसभर गर्दी करत आहेत; तर पाण्यामुळे वाहनचालक त्रस्त असून, छोटे-मोठे अपघातही होत आहेत. 

टाऊन हॉल येथील उड्डाणपुलाखाली कमल तलाव काठोकाठ भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी येते. अनेकवेळा हे पाणी तुंबते. त्यामुळे पावसाळ्यात उड्डाणपूल परिसराला तळ्याचे स्वरूप येते. या पाण्यामध्ये ड्रेनेजचे पाणीही मिसळते व दुर्गंधीयुक्त पाणी अनेक गल्ल्यांमध्येही घुसते. त्यामुळे नागरिक, व्यावसायिक त्रस्त आहेत. येथील पाण्याचा निचरा व्हावा म्हणून,
तत्कालीन प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वतः लक्ष घालत काम करून घेतले होते. मात्र त्यानंतरही हा प्रश्‍न कायमस्वरुपी मिटलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून परतीचा जोरदार पाऊस होत असल्याने येथे पुन्हा पाणी साचत आहे. तलावातील पाण्यासोबतच मासेही वाहून येत आहेत.

हे मासे पकडण्यासाठी लहान मुले दिवसभर उड्डाणपुलाखाली गर्दी करत
आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वारंवार खोळंबा होत असून, पाण्यामुळे उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात खड्डेही पडले आहेत. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार घसरून पडून अपघातही होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिका मुख्यालयाशेजारीच पाण्याचे असे तळे साचलेले असताना प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही, त्यामुळे संताप व्यक्त
केला जात आहे. 
Image may contain: one or more people and outdoor

शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे
शहरातील प्रत्येक रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने वाहनधारक आणि नागरिक अक्षरश: त्रस्त झाले आहेत; मात्र याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे शहराला अक्षरश: बकाल स्वरूप आले आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. शहरात बहुतांश सिमेंटचे रस्ते करण्यात येत
आहेत. नियोजनशून्य कारभार आणि ठेकेदारांची मनमानी यामुळे ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत अशा ठिकाणी वाहनधारकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.

Image may contain: one or more people, outdoor and water

अर्ध्या रस्त्याचे काम सुरू असताना दुसऱ्या बाजूचा रस्ता सुस्थितीत करणे आवश्‍यक असताना, उलट रस्त्यात दगड, विटा, मातीचे ढिगारे टाकून ठेकेदार वाहनधारकांचा रस्ता खडतर करीत आहेत.

जे रस्ते तयार झाले, त्याच्या साईडचे पंखे भरताना मनमानी पद्धतीने मुरुमाऐवजी माती टाकण्यात येत असल्याने सिमेंटचे रस्तेही चिखलमय झाले आहेत. दुसरीकडे ज्या रस्त्यांची कामे सुरू नाहीत, त्या रस्त्यांवर अक्षरश: जीवघेणे खड्डे पडलेले असल्याने वाहनधारक हतबल झाले आहेत. यंदाच्या सततच्या पावसाने शहराच्या रस्त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली; मात्र तरीही महापालिका रस्त्यांची कामे करण्यास तयार नाही किंवा खड्‌डे बुजविण्याचीही गरज महापालिकेला वाटत नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fishing on Road AT Aurangabad