ग्रामस्थांनी लढविली शक्कल, अन कोरोनाचा धोका टळला

Corona
Corona

उदगीर (जि. लातूर) : तालूक्यातील देवर्जन येथे पंधरा नागरिक मुंबईहून दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे सरपंच, ग्राम विकास अधिकारी व आरोग्य विभागाच्या वतीने त्यातील एका कुटुंबांना घरी होम कोरंनटाईम तर बाकी दोन कुटुंबांना जिल्हा परिषद शाळेमध्ये कोरंटाईन करण्यात आले होते.

टाळेबंदित मुंबईहून उदगीर तालुक्यात परवानगी घेऊन आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. यात देवर्जन सहा, कासराळ चार, कबीर नगर व वाढवणा येथील प्रत्येकी एक अशा एकूण बारा जणांना कोरोनाशी लागन झाल्याचा अहवाल बुधवारी (ता.२७) रात्री उशिरा जाहीर करण्यात आला आहे.

उदगीर शहर व तालुक्यातील नवीन रुग्ण येण्याचे प्रमाण आता जवळपास बंद झाले असून बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांनाच लागण झाल्याचे दिसुन येत आहे. देवर्जन, वाढवणा, कासराळ कबीर नगर येथे मुंबईहुन आलेल्या नागरिकांनाच कोरोणाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या नागरिकांमुळे संबंधित गावाचे नाव शासनाच्या दप्तरी नोंद झाले आहे.

कबीर नगर येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर तो रुग्ण ज्या ट्रॅव्हल्स मध्ये आला त्यात देवर्जन येथील १८ जणांनी प्रवास केल्याचे समोर आले. यात १८ जणांची आरोग्य विभागाने तपासणी करून त्यांचे स्वॅब लातुरला पाठवले होते. देवर्जनच्या नागरिकांपैकी बुधवारी आलेल्या अहवालात सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून तीन जणांचे स्वॅब पुन्हा घेऊन पाठवण्यात येणार आहेत.

या अठरा जणांपैकी नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे. देवर्जन येथे पंधरा नागरिक मुंबईहून दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे सरपंच, ग्राम विकास अधिकारी व आरोग्य विभागाच्या वतीने त्यातील एका कुटुंबांना घरी होम कोरंनटाईम तर बाकी दोन कुटुंबांना जिल्हा परिषद शाळेमध्ये कोरंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे गावाला संसर्ग होण्याचा धोका टळला असून बाहेरून आलेल्या नागरिकांनाच कोरोनाची झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com