लातूरजवळ पुलावरून कार कोसळून पाच जण जागीच ठार

विकास गाढवे 
सोमवार, 17 डिसेंबर 2018

लातूर - बार्शी रस्त्यावर मुरुड अकोला (ता. लातूर) गावाजवळ सोमवारी (ता. 17) दुपारी पावणेतीन वाजता पुलावरून कार कोसळून पाच जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत सर्वजण डिकसळ (ता. कळंब) येथील रहिवासी असल्याचे समजते.

लातूर: लातूर - बार्शी रस्त्यावर मुरुड अकोला (ता. लातूर) गावाजवळ सोमवारी (ता. 17) दुपारी पावणेतीन वाजता पुलावरून कार कोसळून पाच जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत सर्वजण डिकसळ (ता. कळंब) येथील रहिवासी असल्याचे समजते.

डिकसळ येथील सात जण कारने लातुरकडे विवाहासाठी येत होते. मुरुड अकोला गावाच्या पश्चिमेला ज्योतिबा मंदिराच्या जवळ असलेल्या पुलावरून कार पंधरा फूट खोल खड्ड्यात कोसळली.

या अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना येथील सर्वोपचार केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ज्ञानेश्वर खंदारे, परमेश्वर अंबिरकर, गणेश सोमसे, जगन्नाथ पवार व नाना शिंदे अशी मयताचे नावे आहेत. जखमीत श्रीकांत अंबिरकर व दत्तात्रय जाधव यांचा सामावेश आहे. 

Web Title: Five dead in a car accident near Latur

टॅग्स