
आयुर्वेद शाखेच्या विद्यार्थ्यांना ५८ प्रकारच्या अॅलोपॅथी शस्त्रक्रीयांना परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने शुक्रवारी (ता. ११) देशव्यापी बंद पुकारला आहे.
बीड : आयुर्वेद शाखेच्या विद्यार्थ्यांना ५८ प्रकारच्या अॅलोपॅथी शस्त्रक्रीयांना परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने शुक्रवारी (ता. ११) देशव्यापी बंद पुकारला आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील पाचशे पेक्षा अधिक खासगी दवाखान्यांची ओपीडी बंद राहणार आहे. केवळ आपत्कालिन व अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत.
जिल्ह्यात या संघटनेच्या दिड हजारांवर डॉक्टरांचे पाचशेंवर दवाखाने आहेत. या संपामुळे या दवाखान्यांतील शुक्रवारची ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) बंद असेल. दरम्यान, केंद्र सरकारने आयुर्वेद (बीएएमएस) शाखेतील पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अॅलोपॅथीच्या ५८ प्रकारच्या शस्त्रक्रीया करण्याची परवानगी दिली आहे. या विरोधात हे आंदोलन आहे.
आयुष डॉक्टरांचा विरोध
अॅलोपॅथी डॉक्टरांनी पुकारलेल्या बंदला आयुष डॉक्टरांनी विरोध केला आहे. डॉ. अरूण भस्मे म्हणाले, आयुर्वेदीक, होमिओपॅथीक व युनानीमध्ये काम करणारे डॉक्टर्स शुक्रवारी गुलाबी फित लावून वैद्यकीय सेवा देतील.
Edited - Ganesh Pitekar