नांदेडजवळ अपघातात पाच ठार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

बिलोली - खासगी मिनीबस आणि वाळू भरलेल्या डंपरची धडक होऊन बसचालकसह पाच जण ठार; तर दहा जण जखमी झाले. बिलोली-नांदेड राज्य मार्गावरील कासराळीजवळ रविवारी (ता. 30) हा अपघात झाला. 

बिलोली - खासगी मिनीबस आणि वाळू भरलेल्या डंपरची धडक होऊन बसचालकसह पाच जण ठार; तर दहा जण जखमी झाले. बिलोली-नांदेड राज्य मार्गावरील कासराळीजवळ रविवारी (ता. 30) हा अपघात झाला. 

पुण्यातील स्वारगेट परिसरातील कडतन कुटुंबीय नातेवाइकांसह एका कार्यक्रमासाठी खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या मिनीबसद्वारे (एमएच 12 एचबी 1957) तेलंगणमधील नंदीपेठ खुदानपूर येथे निघाले होते. सकाळी सहाच्या सुमारास मिनीबस कासराळीजवळ येताच मांजरा नदीपात्रातून वाळू भरून येणाऱ्या डंपरशी (एमएच 04 एफजे 8576) जोरदार धडक झाली. या धडकेत मिनीबसची एक बाजू फाटली. त्यामुळे बसमधील विजयमाला विजय कडतन (वय 50), जयश्री गणपत कडतन (वय 55), सार्थक रवींद्र मगजे (वय 12) जागीच ठार झाले. बसचालक प्रशांत पंडित आणि कस्तुरी गंगाराम कडतन (वय 50) यांचा नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. रेवती संतोष चित्ते, यश संतोष चित्ते, वरद संतोष चित्ते (वय 12), राजश्री नरेंद्र मामुडे (चित्ते), गंगाराम पंढरीनाथ कडतन (वय 80), रेखा मुकेश कडतन (वय 27), कीर्ती रवींद्र मगजे (वय पाच), प्रथमेश मुकेश कडतन (वय आठ), गणपती पंढरीनाथ कडतन (वय 62), पंकज विजय कडतन (वय 23) जखमी झाले. जखमींना नांदेड येथे उपचारार्थ पाठविण्यात आले. 

Web Title: Five killed in Nanded road crash