बचत गटाचे पाच लाख लंपास; देगलूरमध्ये एकावर गुन्हा दाखल 

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

देगलूर शहरातील फुलेनगर भागात वायकिनवर्स प्रा. लि. हैद्राबाद या नावाने तालुक्यात महिलांचे बचत गट ही खाजगी कंपनी कार्यरत आहे. या कंपनीद्वारे अनेक बचत गटांना कर्ज वाटप केले.

नांदेड  : देगलूर तालुक्यात बचत गट स्थापन करून त्याद्वारे दिलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या सदस्यांची पाच लाख रुपयाची रक्कम बँकेत जमा न करता परस्पर हडप केली. या प्रकरणी एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

देगलूर शहरातील फुलेनगर भागात वायकिनवर्स प्रा. लि. हैद्राबाद या नावाने तालुक्यात महिलांचे बचत गट ही खाजगी कंपनी कार्यरत आहे. या कंपनीद्वारे अनेक बचत गटांना कर्ज वाटप केले. या कर्जाची परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांकडून मिळालेली रक्कम एक आॅगस्टपासून ते १३ आॅगस्टपर्यंत परशुराम राठोड याने जमा केले. जवळपास ही रक्कम पाच लाख सात हजार ५७० रुपये कंपनीचा व्यवस्थापक परशुराम मोतीराम राठोड रा. किनी तांडा (भोकर) याने कंपनीच्या खात्यात जमा न करता आपल्या फायद्यासाठी परस्पर घेऊन पसार झाला. ही बाब वरिष्ठ व्यवस्थापक रुपेश सुरेश भाग्यवान यांना समजताच त्यांनी देगलूर पोलिस ठाणे गाठले. २१ बचत गटाचे पाच लाख रुपये घेऊन पसार झालेल्या परशुराम राठोड याच्याविरूध्द फसवणूकीचा व चोरीची तक्रार दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस हवालदार श्री. बोंबले हे करीत आहेत. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Five lakh theft of bachat gat in nanded