वीस लाखांची खंडणी मागून घेतले पाच लाख 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद -  मराठवाडा अध्यापक विद्यालयाच्या माजी प्राचार्याला विद्यमान प्राचार्य व संगणक ऑपरेटरने ब्लॅकमेल केले. त्यांच्याकडे पंचवीस लाखांची खंडणी मागून पाच लाख रुपये उकळले. या प्रकरणात दोघांना गुन्हेशाखेच्या पथकाने गुरुवारी (ता. तीन) अटक केली. 

औरंगाबाद -  मराठवाडा अध्यापक विद्यालयाच्या माजी प्राचार्याला विद्यमान प्राचार्य व संगणक ऑपरेटरने ब्लॅकमेल केले. त्यांच्याकडे पंचवीस लाखांची खंडणी मागून पाच लाख रुपये उकळले. या प्रकरणात दोघांना गुन्हेशाखेच्या पथकाने गुरुवारी (ता. तीन) अटक केली. 

शेख इम्रान शेख उस्मान (रा. मजनू हिल), चिश्‍ती हबीब सईद (रा. जटवाडा) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख इम्रान विद्यमान प्राचार्य असून चिश्‍ती हबीब सईद संगणक ऑपरेटर आहे. डॉ. सोहेल मोहम्मद मुस्तफा मराठवाडा अध्यापक विद्यालयाचे माजी प्राचार्य असून त्यांना व्हीआरएस घेण्यासाठी शेख इम्रान शेख उस्मान दबाव टाकत होता. दबाव टाकल्यानंतर शेख इम्रान स्वत: प्राचार्य झाला. त्याने डॉ. सोहेल मोहम्मद खान यांच्याकडून एका बॅंकेचे धनादेश बुक व दोन सह्या केलेले धनादेश बळजबरीने घेतले. यात संगणक ऑपरेटर चिश्‍ती हबीब याने शेख इम्रान याला मदत केली. डॉ. सोहेल यांच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेजची व्हिडीओ क्‍लिप तयार करून ती शेख इम्रान याला दाखविली. त्यानंतर दोघांनी ब्लॅकमेलिंगचा कट रचला. व्हिडीओ क्‍लिप डॉ. सोहेल यांचे नातेवाईक व कुटुंबीय, महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना दाखवली. त्यानंतर बदनामी टाळण्यासाठी डॉ. सोहेल यांना दोघांनी पंचवीस लाखांची खंडणी मागितली. यात पाच लाख रुपये त्यांनी जबरीने उकळले. अशी तक्रार डॉ. सोहेल यांनी दिली. त्यानुसार, या प्रकरणात सिटी चौक पोलिस ठाण्यात खंडणीच्या गुन्ह्याची दोघांवर नोंद झाली. तत्पूर्वी हे प्रकरण चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे आले होते. गुन्हा नोंद केल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अमित बागूल यांनी संशयितांची कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांना गुरुवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना सात नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक अमित बागूल यांनी दिली. ही कारवाई उपनिरीक्षक अमित बागूल, नंदकुमार भंडारी, बंडू पगारे, राजपूत, गडेकर, शेख नवाब, विकास माताडे, विरेश बने, लखन गायकवाड यांनी केली.

Web Title: Five million taken up with the ransom