बीड जिल्ह्यात नवे पाच रुग्ण आढळले; कोरोनाचे शतक जवळ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

औरंगाबाद येथे उपचार घेणारा एक रुग्ण बुधवारी कोरोनामुक्त झाला असून आणखी चौघांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. गुरुवारी बीडमधून तीन तर पुणे येथून एकाला कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.

बीड  : माळेगाव (ता. केज) येथे बुधवारी (ता. १७) चार तर बीड शहरात एक असे नवीन पाच कोरोनाग्रस्त आढळले. आढळलेले सर्व रुग्ण हे जुन्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत. बुधवारी पाठविलेल्या ५८ थ्रोट स्वॅबपैकी ५३ स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आले. तर, पाच पॉझिटीव्ह आले. पाच नवीन रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ९७ झाली आहे.

औरंगाबाद येथे उपचार घेणारा एक रुग्ण बुधवारी कोरोनामुक्त झाला असून आणखी चौघांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. गुरुवारी बीडमधून तीन तर पुणे येथून एकाला कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.

हेही वाचा - गावरान आंबा बाजारातून गायब

बुधवारी जिल्ह्यातून पाठविलेल्या स्वॅबमध्ये बीड व केजसह विविध ठिकाणच्या लोकांच्या स्वॅबचा समावेश होता. केज तालुक्यातील माळेगाव येथील ६० वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मंगळवारी औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला होता. तिच्या संपर्कातील चौघांना कोरोनाची बाधा असल्याचे समोर आले. यामध्ये एक ३८ वर्षीय पुरुष, ३६ वर्षीय महिला, ६२ वर्षीय पुरुष तसेच एका १३ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. तर, हैदराबाद येथे जाऊन आलेल्या बीड शहरातील मसरतनगर भागातील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील हिनानगर भागातील ५२ वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाची बाधा असल्याचे समोर आले.

जिल्ह्यात ९७ रुग्ण
दरम्यान, बुधवारी आढळलेल्या पाच रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ९७ वर पोचली आहे. दरम्यान, आतापर्यंत ६८ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश आले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले दोघे जिल्ह्यातील तर एक नगर जिल्ह्यातील आहे. यात दोन मृत्यू बीडच्या रुग्णालयात तर एक औरंगाबादला झाला. आता २६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
----
आज चौघांना डिस्चार्ज
दरम्यान, बुधवारी औरंगाबाद येथे उपचार घेणारा एक कोरोनामुक्त होऊन जिल्ह्याची कोरोनामुक्तांची संख्या ६८ वर पोचली. गुरुवारी बीड रुग्णालयातून तिघांना डिस्चार्ज दिला जाईल. तर, पुणे येथील एकाला कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज दिला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five new corona patients were found in Beed district