ट्रक-एसटी बसच्या धडकेत चालकासह पाच गंभीर

मनोज साखरे
बुधवार, 9 मे 2018

औरंगाबाद - एसटी बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत चालकासह 36 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात औरंगाबादेत-चौका-फुलंब्री रस्त्यावर बुधवारी (ता. 9) दुपारी दीडच्या सुमारास झाला. 

औरंगाबादमधून सिल्लोडकडे जाणारी बस चौका गावाजवळ आली. त्यावेळी समोरून आलेल्या ट्रकची व बसची समोरासमोर धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला.

बसचालकाच्या शरीरात पत्र्याचा काही भाग घुसला. पत्रा कापून चालकाला उपचारासाठी नेण्यात आले तसेच बसमधील सुमारे 36 प्रवासी जखमी झाले अशी प्राथमिक माहिती आहे. या सर्वांना औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

त्यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे, असे घाटी रुग्णालय येथील पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Five seriously injured in a truck-ST bus crash

टॅग्स