नववधूला स्वखर्चाने पाच हजारांसह मोफत गॅसजोडणीही...!

नववधूला स्वखर्चाने पाच हजारांसह मोफत गॅसजोडणीही...!

आष्टी (जि. बीड) : स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसला जाऊन घराघरात स्त्री जन्माचं स्वागत व्हावं यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. याच उदात्त हेतूने प्रेरीत होऊन तालुक्यातील टाकळी आमिया येथील ग्रामपंचायतीने मागील दोन वर्षांपासून सरपंच कन्यादान योजना व सावित्रीबाई फुले कन्यादान योजनेचा सुत्य उपक्रम सुरु केला आहे.

नववधूला पाच हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह मोफत गॅस जोडणी देऊन गरजू वधुपित्याला आधार देण्याचे काम ग्रामपंचायतीमार्फत सुरु आहे. तालुक्यातील टाकळी आमिया येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच निशा ससाणे यांनी वधुपित्याला आर्थिक दिलासा मिळावा या सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने दोन वर्षांपूर्वी गावात सर्व धर्मियांसाठी स्वखर्चाने सरपंच कन्यादान व सावित्रीबाई फुले कन्यादान योजना सुरू केली आहे. गावातील कुठल्याही गरीब कुटुंबातील मुलीचे लग्न ठरल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून नववधूपित्याला नगदी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याबरोबरच मोफत गॅसजोडणीही देण्यात येते.

भीषण दुष्काळी परिस्थितीत गोरगरिबांपोटी सहानुभूती बाळगत निशा ससाणे व त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते सावता ससाणे यांनी आतापर्यंत 45 वधुपित्यांना या योजनेचा लाभ दिला असून जिल्ह्यातील या पहिल्यावहिल्या लोकोपयोगी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लग्नसमारंभासाठी श्रीमंतीचं प्रदर्शन करत डामडौल मिरवणाऱ्या धनदांडग्यांसाठी हा उपक्रम प्रेरणादायीच म्हणावा लागेल. 

सहभागी होण्यासाठीच्या अटी
या योजनेत सहभाग होणेसाठी कुटूंबातील व्यक्तीकडे चारचाकी वाहन व शासकीय नोकरी नसावी, मतदान यादीत नावाबरोबरच ती व्यक्ती गावची रहिवासी असावी अशी अट असून अर्जदाराने अर्जासोबत शाळेचा दाखला, आधार कार्ड व शौचालय वापरत असलबाबत ग्रामपंचातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

जिल्ह्याला लागलेला स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसला जाऊन मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी, घराघरात कन्यारत्नाचं स्वागत व्हावं; तसेच दुष्काळी भागातील वधु-पितला काहीतरी आर्थिक मदत व्हावी या हेतूने सरपंच कन्यादान व सावित्रीबाई फुले कन्यादान योजना आम्ही ग्रामपंचायतीतर्फे सुरू केली आहे. 
- निशा ससाणे, सरपंच, टाकळी आमिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com