‘जायकवाडी’त पाहुण्या पक्ष्यांचा मेळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

औरंगाबाद - यंदा अल्प पाऊस झाला. परिणामी, पैठण येथील जायकवाडी जलाशयात कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे जलाशयातील वनस्पती वर येऊन पक्ष्यांसाठी मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध झाले आहे. दरम्यान, यंदा फ्लेमिंगोंचे थवे वेळेवर येऊनही त्यांना जायकवाडीत येण्यास नोव्हेंबरचा तिसरा आठवडा लागला. रविवारी (ता. ३०) पक्षीप्रेमींनी जलाशयावर फ्लेमिंगोंसह २५ प्रकारच्या विविध देशी-विदेशी पक्ष्यांची नोंद केली.

जायकवाडी जलाशयावरील जालना पंप हाउस, सूर्यवाडी परिसरातील स्पॉटवर फ्लेमिंगोंचे थवे आढळून आले. ऑक्‍टोबरपासून पक्षीप्रेमी निरीक्षणासाठी जलाशयावर येतात; पण यंदा सुरवातीला पक्ष्यांची संख्या तेवढी नव्हती. 

रविवारी चक्रवाक, परी, सरंगबाडा, सुंदर बटवा, चिमणशेंद्या, समुद्र पक्षी, नदी सुरयत, पाणकावळा, उघड्या चोचीचा करकोचा, कंकर, काळा कंकर, तुतवार, लहाना टिलवा, पांढऱ्या मानेचा करकोचा, रंगीत करकोचा यासह किंगफिशर हे पक्षी आढळून आलेत. जायकवाडी जलाशयावर मार्च ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्यांचा मुक्काम असेल, अशी माहिती पक्षीतज्ज्ञांनी दिली.

Web Title: Flemingo Bird in Jayakwadi Dam