लातुरातून विमानाचे उड्डाणही होईल : सुनील गायकवाड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

लातूर : लातुरात पासपोर्ट कार्यालय सुरु झाले. आता उडान योजनेतून विमानाचे उड्डाणही लातुरातून व्हावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच विमानसेवा सुरु होईल, असे आश्वासन खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी दिले. हज यात्रेकरूंसाठीसाठी स्वतंत्र विमान लातुरातून उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत, असेही ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या विदेश मंत्रालयाच्या वतीने लातूरमधील पासपोर्ट सेवा केंद्राचे उदघाटन डॉ. गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी (पुणे) अनंत ताकवले, औरंगाबाद पासपोर्ट विभागाचे बी. आर. अरमुगन उपस्थित होते.

पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्याने लातुरकरांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. आता विमानसेवा येथे सुरु व्हायला हवी, अशी लातूरकरांची अपेक्षा आहे, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले. हा धागा पकड गायकवाड बोलत होते. मागच्या चार वर्षात खासदार या नात्याने बरीच विकासकामे करता आली. पूर्वीच्या लोकांनी अशी कामे केली नाहीत, असेही गायकवाड यांनी सांगितले.

हे सिमोल्लंघनाचे प्रतीक

पासपोर्ट कार्यालय हे सिमोल्लंघनाचे प्रतीक आहे. पुणे क्षेत्रीय कार्यलयांतर्गत येणारे लातूरमधील हे अकरावे कार्यालय आहे. या संधीचा लातूरकरांनी लाभ घ्यावा, असे ताकवले यांनी सांगितले. पारपत्रासाठी अर्ज भरताना चुकीची माहिती भरू नका. गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर लपवू नका. कारण दंडात्मक कारवाई केली जाते असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Flight will also fly from Latur Sunil Gaikwad