फ्लिपकार्टचे अधिकारी  समोर येण्यास तयार नाहीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

औरंगाबाद - फ्लिपकार्टवरून शस्त्रे खरेदीचे प्रकार शहरात उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी भिवंडीत छापे घातले. यात फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या; पण ते पोलिसांसमोर येण्यास तयार नाहीत. त्यांनी तपासात अत्यावश्‍यक असलेली कागदपत्रेही पोस्टाने पाठविली आहेत.   

ऑनलाइन शस्त्रांच्या मागणीची पूर्तता करणाऱ्या नागेश्वरवाडी व जयभवानीनगरातील इन्स्टाकार्ट या फ्लिपकार्टची को-पार्टनर असलेल्या कुरिअर कंपनीवर २८ मेच्या रात्री गुन्हेशाखा पोलिसांनी छापे घातले होते. यात खेळण्याच्या नावाखाली फ्लिपकार्टद्वारे मागविण्यात आलेली ऑनलाइन शस्त्रे जप्त केली होती. यानंतर पोलिसांनी फ्लिपकार्टची चौकशी सुरू केली. भिवंडीत छापे घालून संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत; पण त्यानंतरही फ्लिपकार्टशी संबंधित अधिकारी गुन्हेशाखेसमोर हजर झालेले नाहीत. त्यांनी वकिलामार्फत आपली बाजू मांडली. तसेच या सर्व प्रकरणातील कंपनी व शस्त्रखरेदीशी संबंधित दस्तऐवज चक्क पोस्टाने पाठवला, अशी माहिती गुन्हेशाखेचे सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी दिली.  

अन्य कंपन्यांशी टायअप
शस्त्र किचन वेअर व डेकोरेटिव्ह असल्याचा दावा फ्लिपकार्ट करीत आहे. फ्लिपकार्टने शस्त्र पुरविणाऱ्या अन्य तीन कंपन्यांशी करार केला आहे; मात्र या कंपन्यांना शस्त्रे तयार करण्याची परवानगी आहे का, याचा तपास सुरू असून, कायद्याची बाजू तपासून या कंपन्यांवर कारवाई होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Flipkart Online shopping issue