कळमनुरीमध्ये नद्यांना पूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

कळमनुरी : शहर व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कयाधू व पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे. कोंढुर गावालगत कयाधु नदीचे पाणी पोहोचले असून सोडेगाव, सांडस, वाकोडी या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा वाहतूक संपर्क तुटला आहे. कयाधू व पैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.  

मागील 24 तासात शहर व परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे परिसरातील ओढे नाले भरून वाहत असताना कयाधू व पैनगंगा नदीने ही आपले पात्र ओलांडून दुथडी भरून वाहत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे कोंढुर गावाला पाण्याचा वेढा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नदीचे पाणी गावापर्यंत पोहोचले असून गावालगत असलेली मंदिरही पाण्याखाली गेले आहे.

दुसरीकडे नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे सोडेगाव जवळील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे कळमनुरी वसमत औंढा नागनाथ नांदापूर बोल्डा या गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे सोडेगाव नांदापूर सावंगी भुतनर सालेगाव चाफनाथ टाकळगव्हाण या गावांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यातून नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून नदीच्या दोन्ही काठा कडून असलेल्या शेतीमधील सर्व पिके व जमीन खरडून गेली आहेत. दुसरीकडे वाकोडी गावाजवळून वाहणाऱ्या मोठ्या नाल्याला पूर आल्यामुळे वाकोडी गावालगत पाणी आले आहे. डोंगरगाव नाका गांगापुर या भागातील पुलावरून नाला व नदीपात्राचे पाणी भरून वाहत असल्यामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे.

संततधार पावसामुळे या भागातही नदीच्या ओढ्याच्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान आहे. कळमकोंडा तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्यामुळे सांडव्यावरून सुटलेले पाणी सांडस गावाजवळील पुला वरून वाहत असल्यामुळे सालेगाव रुपुर म्हेसगव्हाण येळेगाव गवळी हा मार्गही वाहतुकीकरिता बंद झाला आहे.

Web Title: flood at river in kalamnuri

टॅग्स