लेंडी नदीला पूर; नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

तालुक्यात गत दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसाने मंगळवारी (ता.21) रोजी पहाटे पासून बहुतांश नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. लेंडी या नद्यापलीकडील आठ गावांचा संपर्क तुटला आहे.

पालम : तालुक्यात गत दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसाने मंगळवारी (ता.21) रोजी पहाटे पासून बहुतांश नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. लेंडी या नद्यापलीकडील आठ गावांचा संपर्क तुटला आहे.

पालम तालुक्यात गत दोन दिवसांपासून संततधार चालुच होती. दरम्यान, पहाटे चार वाजता जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहिले आहेत. जमिनीत ओल जास्त झाल्याने पडलेला प्रत्येक थेंब जमिनीच्या बाहेर येत असल्याने केरवाडी जवळून पालम शहरापासुन वाहणाऱ्या लेंडी नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने नद्यांपल्याड असनाऱ्या आरखेड, सोमेश्वर, ऊमरथडी, सायाळ, फळा, घोडा, आदी गावांचा संपर्क तुटला होता.

Web Title: floods in parabhani district

टॅग्स