
तालुक्यातील श्री क्षेत्र नर्सी नामदेव येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा जन्मोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला.
हिंगोली : संत नामदेव महाराज यांच्या ७५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावयाची होती मात्र कोरोना संकटाने ती करता आली नाही, परंतु ७५१ वी जयंती उत्साहात साजरा करुन मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्याची ग्वाही पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी (ता. २६) नर्सी येथे दिली.
तालुक्यातील श्री क्षेत्र नर्सी नामदेव येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा जन्मोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. संत नामदेव महाराज यांचा ७५० व्या जयंती सोहळ्या निमित्त संत नामदेव मंदिर संस्थांकडून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सहा वाजता पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत मंदिर परिसरात दिपोत्सव झाला तसेच सपत्नीक व सुधीर सराफ यांच्या हस्ते श्रीच्या वस्त्र समाधीची महापुजा करण्यात आली.
हेही वाचा - नांदेड : कृषी विषयक योजनांतून शेतकरी विकास- ‘नाबार्ड’चे राजेश धूर्वे -
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, संजय बोंढारे, विनायक देशमुख, संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी किर्तनकार, सुभाष हुले, रामराव सोळंके, भारत महाराज, प्रकाश थोरात, डॉ. रमेश शिंदे, माधवराव पवार, अँड के. के. शिंदे, नारायण खेडकर, दाजीबा पाटील, शामराव जगताप, काशीराम महाराज, लोकेश चैतन्य स्वामी, शिवाजी कऱ्हाळे, विठ्ठल चौतमल, भगवान खंदारे,दिलीप देसाई,अनिल नैनवानी,डॉ. रोडगे, विलास गोरे, भागवत सोळंके, शिवशंकर वाबळे, ओम देशमुख, विलास कानडे आदी उपस्थित होते.
संत नामदेवाचा ७५० वा जन्म सोहळा साजरा करण्यासाठी भल्या पहाटे पासूनच भाविकांनी तोंडाला मास्क लावून मंदिर परिसरात आले होते. मंदिर परिसरामध्ये फुलांनी रांगोळ्या काढण्यात पणत्या लावून व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. यावेळी बोलताना पालकमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राष्ट्रीय संत श्री नामदेव महाराज यांची जयंती आपण उत्साहात साजरी करताना अतिशय समाधान होत असून हा ७५० जन्म सोहळा असल्याने हा सोहळा भव्य आणि मोठ्या उत्साहाने लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करायचा होता. परंतु सध्या कोरोनाच्या उद्भवलेल्या संकटामुळे तसे करता येत नाही. परंतु संत नामदेव महाराज यांचा ७५१ वा जन्म सोहळा हा मोठा उत्साहाने सर्वानी मिळून हेलिकॉप्टरमधून संत नामदेव महाराज यांच्या मंदिरावर पुष्प वृष्टी करून साजरा होणार.
संपादन - प्रल्हाद कांबळे