मराठवाड्यातील साहित्य-संस्कृतीवर प्रकाशझोत

सुशांत सांगवे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

लातूर : मराठवाड्यातील साहित्य-संस्कृती, परिवर्तनवादी चळवळींचा इथल्या साहित्यावर झालेला परिणाम, मराठवाड्याच्या मातीत तयार झालेले लोकसाहित्य, कन्नड-तेलुगू अशा भाषांशी असलेला मराठीचा संबंध या आणि अशा अनेक महत्वाच्या विषयांवर ‘सुबंरान’ या स्मरणिकेच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यानिमित्ताने या क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला दस्ताऐवजच उपलब्ध होणार आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेचे 40वे मराठवाडा साहित्य संमेलन यंदा उदगीरमध्ये होणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने सुंबरान ही स्मरणिका तयार करण्यात आली असून तिचे प्रकाशन संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात (ता. 23) होणार आहे. यात केवळ लातूर जिल्ह्यातील नव्हे वेगवेगळ्या राज्यातील लेखकांनी मराठवाड्यातील साहित्य-संस्कृतीशी संबंधीत विषयावर लेख लिहिले आहेत. हे या स्मरणिकेचे वेगळेपण आहे.

यासंदर्भात स्मरणिकेचे संपादक म. ई. तंगावार म्हणाले, स्मरणिकेची मांडणी आम्ही पाच भागात केली आहे. पहिल्या भागात कन्नड, तेलुगू, कोकणी अशा भाषांचा आणि मराठीचा संबंध वाचायला मिळेल. गुजराती आदिवासी समाज, त्यांची संस्कृती आणि महाराष्ट्राचा संबंध यावरही आम्ही लेख समाविष्ट केला आहे. दुसऱ्या भागात बृहन्‌ महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी शिक्षण याची काय स्थिती आहे, याची सद्यस्थिती मांडली आहे. तिसरा भाग हा मराठवाड्यातील साहित्य-संस्कृतीशी संबंधीत आहे. तर चौथा भाग हा उदगीरचे अक्षरयात्री या नावाने इथल्या लेखकांवर, साहित्यावर आधारित ठेवला आहे. अखेरच्या भागात यापूर्वी उदगीरमध्ये 1956 मध्ये झालेल्या आठव्या संमेलनाची सविस्तर माहिती दिली आहे. नियोजित संमेलनाध्यक्षांची मुलाखत वाचायला मिळेल. शिवाय, आजवरच्या मराठवाडा संमेलनाचे स्थळ आणि संमेलनाध्यक्ष नावे अशी यादीही दिली आहे. त्यामुळे ही स्मरणिका संग्राह्य राहिल, अशी आम्हाला खात्री वाटते.

Web Title: focusing on literature in Marathwada