esakal | मानवलोककडून बेवारसांच्या भोजनाची सोय 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

बंदमुळे रस्त्यावर बेवारस फिरणारे व दारोदार मागून पोटाची खळगी भरणारांची भूक कोण भागवणार? ही अडचण लक्षात घेऊन येथील मानवलोक जनसहयोगने या भुकेल्यांची दोनवेळच्या जेवणाची सोय केली आहे. 

मानवलोककडून बेवारसांच्या भोजनाची सोय 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई (जि. बीड) - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सध्या सर्वत्र संचारबंदी आहे. दुकानेही बंद व नागरिक घरात बसून आहेत. या बंदमुळे रस्त्यावर बेवारस फिरणारे व दारोदार मागून पोटाची खळगी भरणारांची भूक कोण भागवणार? ही अडचण लक्षात घेऊन येथील मानवलोक जनसहयोगने या भुकेल्यांची दोनवेळच्या जेवणाची सोय केली आहे. 

शहरात दररोज विविध ठिकाणी निराधार व बेवारस लोक दारोदार मागून आपल्या पोटाची भूक भागवतात. यात काही मनोरुग्णांचाही समावेश आहे. असे लोक इतर शहरात व गावातही असतात; परंतु सध्या सर्वत्र संचारबंदी असल्याने रस्ते सामसूम आहेत. दुकान, हाॅटेल बंद आहेत. नागरिकही रस्त्यावर नाहीत. त्यामुळे या बेवारस लोकांची भूक कोण भागवणार? कदाचित या संचारबंदीत भूकबळी उद्‍भवू नये याची दक्षता घेत जनसहयोगने रस्त्यावरच्या या बेवारसांना दोनवेळच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.

हेही वाचा - अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरातील दर्शन बंद, फक्त पुजाऱ्यांना प्रवेश

मानवलोक जनसहयोगचे कार्यकर्ते श्‍याम सरवदे यांच्यासह संजना आपेट, सावित्री सगरे, मारवाळ यांनी मंगळवारी (ता.२४) या बेवारस व मनोरुग्णांना दोनवेळचे जेवण उपलब्ध करून दिले. ते जिथे भेटतील तिथे त्यांना हे भोजन दिले. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या कार्याचा वारसा मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांच्यासह कार्यकर्त्यांनी सुरू ठेवला आहे. शहर व परिसरात फिरणारे निराधार मनोरुग्ण, अपंग यांना नेहमीच जनसहयोगचा आधार असतो. त्यांना अंघोळ घालणे व स्वच्छता, कपडे, उदरनिर्वाह यांची काळजी घेतली जाते. 

loading image