बेघर व्यक्तींच्या पोटाला अन्नदात्यांचा आधार 

उमेश वाघमारे 
Saturday, 28 March 2020

रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांसह काही सामाजिक संस्था या हताश असलेल्या व्यक्तींच्या पोटाला अन्न देत आहेत. त्यामुळे या संचारबंदी या बेघर, भिक्षा मागणाऱ्यांच्या पोटाची खळगी भरत आहे. 

जालना -  कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे भिक्षा मागून पोट भरणाऱ्यांचे सध्या सर्वाधिक हाल सुरू आहेत. मात्र, जनतेसाठी कोरोनाचे सावट असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांसह काही सामाजिक संस्था या हताश असलेल्या व्यक्तींच्या पोटाला अन्न देत आहेत. त्यामुळे या संचारबंदी या बेघर, भिक्षा मागणाऱ्यांच्या पोटाची खळगी भरत आहे. 

हेही वाचा :  जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

मागील आठवड्यापासून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून जिल्ह्यात सुरवातील जमावबंदी आणि नंतर संचारबंदी लागू झाली आहे. त्यामुळे भिक्षा मागून पोट भरणाऱ्यांवर चक्क उपासमारीची वेळ आली आहे.

हेही वाचा :  कोल्हापूरहून आलेल्या ऊसतोड मजूरांची तपासणी

या संचारबंदीत कोरोना विषाणूच्या सावटाखाली आपल्या जिवाची पर्वा न करता जालन्यात पोलिस नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे आहेत. विनाकारण रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांना सुंदरीचा प्रसाद ही पोलिस देतात सर्वांना माहीत झाले आहे, मात्र हेच पोलिस आपल्या घासातील घास संचारबंदीदरम्यान निराधार, बेघर लोकांना देत आहेत. फूड पॉकेट देऊनही गरजूंच्या पोटाची भूक भागविली जात आहे. 

पाझर संस्थाचे अन्नदान सुरूच 

शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक, मंदिर आदी ठिकाणी बसणाऱ्या बेघर व्यक्तींना पाझर संस्थेकडून अन्नदान केले जाते. मागील काही वर्षांपासून पाझर संस्थेचा हा उपक्रम सुरू आहे. संचारबंदीतही पाझर संस्थेचे पदाधिकारी नियमितपणे या भिक्षा मागून पोट भरणारे आणि बेघर लोकांना अन्नपुरवठा करीत आहेत. परिणामी पाझर संस्थेमुळे अनेक बेघर, वृद्ध, अपंग व्यक्तीच्या पोटाची खळगी भरली जात आहे. पाझर संस्थेच्या या अन्नदानाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

भाजपतर्फे एप्रिलपासून फूडपॉकेट 

भारतीय जनता पक्षातर्फे जालना शहरातील गरजू कामगार व इतर गरजू नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना ता.एक एप्रिलपासून घरपोच फूडपॉकेटचे वाटप केला जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी कळविले आहे. आपत्तिग्रस्तांच्या व्यवस्थापनासाठी व त्यांना वेळेत मदत मिळावी म्हणून जिल्हाध्यक्ष दानवे यांनी जालना शहरातील भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Food for homeless in jalna