उरलेल्या अन्नातून भागवली हजारोंची भूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

औरंगाबाद - अनेक गरीब भुकेले राहत असताना विवाह सोहळ्यांतील जेवणावळीत मोठ्या प्रमाणात अन्न शिल्लक राहते. हेच भुकेले चेहरे पाहून अस्वस्थ झालेल्या संवेदनशील व्यक्तींनी औरंगाबाद शहरात ‘अन्न वाचवा समिती’ स्थापन करीत ‘मिशन फॉर हंगर फ्री सिटी’ने हा उपक्रम राबविला. त्यांनी यंदाच्या लग्नसराईतील ४२ मुहूर्तांमधून सुमारे ३५ हजार लोकांना पुरेल इतके अन्न जमा करून गरजूंपर्यंत पोहोचविले. 

मंगल कार्यालयांकडून साधारणत: एका मुहूर्तावर पाच ते सहा हजार लोकांना पुरेल इतके शिल्लक राहिलेले अन्न मिळाले, असे ‘अन्न वाचवा समिती’चे अनंत मोताळे यांनी सांगितले. जमा झालेले सर्व अन्न रेल्वे स्टेशन, बस स्थानके, उड्डाण पुलांचा परिसर, मंदिरांबाहेर बसणारे भिक्षेकरी, निराधार, रस्त्यांच्या कडेने पाल ठोकून राहणाऱ्या गरजूंना वाटण्यात आले.

Web Title: food poor Appetite humanity motivation