सहा हजारांची लाच घेताना वनपाल जाळ्यात

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 10 जानेवारी 2019

नांदेड :  नुकसान भरपाईचे बिल मंजूर करण्यासाठी सहा हजारांची लाच स्विकारण्याचे पडताळणी सापळ्यात निष्पन्न झाले. यावरून वनपाल शिवप्रसाद मठवाले याच्याविरूध्द इस्लापूर ठाण्यात लाचेचा गुन्हा गुरूवारी (ता. दहा) दाखल झाला आहे. 

किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत असलेला वनपाल शिवप्रसाद बसलिंगप्पा मठवाले (वय ४३) याच्याकडे तक्रारदार शेतातील पीकांचे वन्य प्राण्यांकडून मोठे नुकसान झाल्याने भरपाईसाठी गेले होते. परंतु नुकसान भरपाई बिल मंजुरीसाठी लाचखोर वनपालाने तक्रारदारास दहा हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती सहा हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने नांदेड येथे येऊन २७ डिसेंबर २०१८ रोजी तक्रार दिली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पडताळणी सापळा लावण्यात आला.

यामध्ये सहा हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. यावरून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस उप-अधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली साजीद अली, शेख चांद, सुरेश पांचाळ, अंकुश गाडेकर, शिवहार किडे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Forest Employee Trapped while taking bribe