अपसंपदा प्रकरणी वनविभागाचा निवृत्त लिपीक पोलिसांच्या जाळ्यात 

प्रल्हाद कांबळे 
बुधवार, 16 मे 2018

वन विभागातील सेवानिवृत्त लिपीक श्रीराम पांचाळ यांनी आपल्या मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याप्रकरणी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. ७७ लाख ७१ हजार ९७१ रुपयाची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड - वन विभागातील सेवानिवृत्त लिपीक श्रीराम पांचाळ यांनी आपल्या मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याप्रकरणी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. ७७ लाख ७१ हजार ९७१ रुपयाची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हदगाव वन परिक्षेत्र कार्यालयातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले श्रीराम हरिशचंद्र पांचाळ (वय ५८) यांनी त्यांचे ज्ञात उत्पन्नाचे तुलनेत ७७ लाख ७१ हजार ९७१ रुपयाची विसंगत मालमत्ता संपादीत केल्याचे व सदर कृत्यास त्यांची पत्नी केशरबाई यांनी त्यांना अपप्रेरणा देऊन सहकार्य केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरूद्ध लाचेचा गुन्हा दाखल झाला आहे.

श्रीराम पांचाळ यांना सप्टेंबर १९८७ ते जानेवारी २०१५ या काळात कायदेशीररित्या प्राप्त झालेल्या आर्थिक साधन संपतीच्या तुलनेत त्यांच्याकडे आढळून आलेल्या अधिक मालमत्तेबाबत ते समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करणारे पोलिस निरीक्षक अशोक गिते यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

Web Title: forest retired clerk is arrested