esakal | औंढ्यात माणुसकीचे घडले दर्शन; विसरलेली एक लाख दहा हजाराची सोनसाखळी केली परत 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

औंढा येथील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक- भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात

औंढ्यात माणुसकीचे घडले दर्शन; विसरलेली एक लाख दहा हजाराची सोनसाखळी केली परत 

sakal_logo
By
कृष्णा ऋषी

औंढा नागनाथ ( जिल्हा हिंगोली ) : येथील नागनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या व श्रीकृपा मंगल कार्यालयात मुक्कामी थांबलेल्या छतीसगड येथील एका भाविकाची विसरलेली एक लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी व्यवस्थापक व मालकाने संबंधियताना गुरुवारी (ता. २८) परत करुन माणुसकीचे दर्शन घडविले.

औंढा येथील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक- भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात. छतीसगड येथून आलेल्या भक्तांनी बुधवार (ता. २७) येथील श्रीकृपा मंगल कार्यालयात थांबुन दर्शन झाल्यावर ते परत निघून गेले. त्यानंतर श्रीकृपा भक्तनिवास रुम क्रमांक १०९ बंद करुन चावी जमा केली. नंतर ते भक्त घृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी औरंगाबादकडे निघुन गेले. नंतर श्रीकृपा मंगल कार्यालयातील व्यवस्थापक विनायक गुहाडे हे गुरुवारी (ता. २८) सकाळी दहाच्या सुमारास श्रीकृपा भक्तनिवासमध्ये रुम चेक करत असताना त्याना सोन्याची साखळी अंदाजे किंमत एक लाख दहा हजार रुपये असलेली सापडली. त्यानंतर त्याने लगेच श्रीकृपा भक्‍तनिवासचे मालक दीपक जवळेकर यांना सांगितले.

हेही वाचा - मालवाहतुकीमध्ये नांदेड रेल्वे विभाग अग्रेसर, सव्वापाच कोटीचा महसुल मिळवला

त्यांनी रजिस्टरवर नोंद असलेले भक्त, नोंद असलेली रुम क्रमांक १०९ यामध्ये कोण रात्रीला राहिले  त्याची चौकशी केली. त्यामध्ये अरुण गोयल अंबिकापूर, छत्तीसगढ हे भक्त आपल्या कुटुंबासह रात्रभर होते. त्यांनी लगेच अरुण गोयल यांना फोनवर संपर्क केला व श्रीकृपा भक्तनिवास औंढा नागनाथ येथे बोलावून घेतले. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास अरुण गोयल अंबिकापुर छत्तीसगड या भक्तांना २२ ग्रँमची अंदाजे  एक लाख दहा हजार रुपयाची सोन्याची साखळी वापस केली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील, गणेश राठोड, श्रीकृपा भक्तनिवासचे मालक दीपक जवळेकर, विनायक गुहाडे, राहुल मोगले, मनोज जवळेकर, दिनकर तोंडे, द्वारकादास सारडा, त्र्यंबकराव कुटे, श्रीराम राठी, दत्ता शेगुकर, लक्ष्मण स्वामी, बाळू स्वामी आदी उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top