भाजपचे माजी शहराध्यक्ष नीलेश ठक्कर सक्रिय 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

लातूर - कामगारमंत्री तथा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते गोरोबा गाडेकर, नगरसेविका संध्या आरदवाड व महानगरप्रमुख गणेश गवारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याबरोबरच भाजपचे माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक नीलेश ठक्कर पुन्हा सक्रिय राजकारणात उतरले आहेत. 

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, मंडळ अध्यक्ष गुरुनाथ मगे, सुनील होनराव, नागनाथ म्हेत्रे, अनिल शिंदे, माजी उपमहापौर सुरेश पवार, नगरसेवक रवी सुडे, धनराज साठे, पृथ्वीसिंह बायस, मनोज मालू, श्रीमंत जाधव, गीता गौड, हनमंत जाकते, अजय कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पालकमंत्री निलंगेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून सर्वांना सन्मानाची वागणूक मिळेल, अशी ग्वाही दिली. जिल्हा परिषदेत एका शेतकऱ्याला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केले. महापालिकेतही सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता महापौर होईल, असा शब्द त्यांनी दिला. श्री. ठक्कर यांचा उल्लेख "भाजपचे नेते' असा करून, त्यांना या दोन प्रभागांसह संपूर्ण शहरात काम करण्याचे आवाहन केले. 

श्री. ठक्कर व पालकमंत्री निलंगेकर यांच्यात काही दिवसांपूर्वी बैठक होऊन पालिकेच्या निवडणुकीवर चर्चा झाली होती. तेव्हापासून ठक्कर पडद्यामागे निवडणुकीची व्यूहरचना आखत होते. मात्र, मंगळवारच्या कार्यक्रमाद्वारे त्यांनी आता सक्रिय झाल्याचे संकेत दिले. श्री. लाहोटी म्हणाले, की पालकमंत्री निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद जिंकली. आता महापालिकेत 52 नगरसेवक निवडून येतील. श्री. ठक्कर, श्री. गाडेकर, श्री. जाधव यांची भाषणे झाली. 

ठक्कर यांची भूमिका महत्त्वपूर्ण 
भाजपचे माजी शहराध्यक्ष नीलेश ठक्कर यांनी यापूर्वी डॉ. गोपाळराव पाटील, रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे. ते भाजपचे नगरसेवकही होते. कालांतराने ते उद्योगात वैयक्तिक सक्रिय झाले. पालकमंत्री निलंगेकर यांच्या आग्रहामुळे ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होत आहेत. भाजपमधील सध्या जे इनकमिंग सुरू आहे, त्यामध्ये ठक्कर यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. 

Web Title: Former BJP president Nilesh Thakkar active