राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर

राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर

वसमत : राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर तर उपाध्यक्षपदी श्रीराम शेटे, आबासाहेब पाटील यांची मंगळवारी (ता.३०) बिनविरोध निवड झाली आहे.

मुंबई येथे साखर संकुलात आज संचालकांची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील, गणपतराव तिडके यांच्यासह संचालकांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षपदी दांडेगावकर व उपाध्यक्षपदी शेटे व पाटील यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर उपस्थित संचालक व मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. 

वसमत (जि.हिंगोली) येथील पूर्णा कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या माजीमंत्री दांडेगावकर यांचा सहकार क्षेत्रात चांगलाच दबदबा आहे. साखर कारखानदारी अडचणीत असतांनाही काटकसरीचे धोरण राबवून त्यांनी पूर्णा सोबतच बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखाना (जवळाबाजार, ता. औंढा) चालविण्यास घेतला आहे. दोन्ही कारखान्यांचे यशस्वीपणे व्यवस्थापन करून दाखविले आहे. याशिवाय कारखानदारी यशस्वीपणे सुरु ठेवण्यासाठी उपपदार्थ निमिर्तीही केली पाहिजे या भुमीकेतून त्यांनी पूर्णा कारखान्याकडून विज निर्मिती प्रकल्प इथेनॉल, डिस्टलरी प्रकल्प देखील सुरु केले आहे. त्यांच्या या कार्यकुशलतेची दखल घेऊन त्यांची राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. दांडेगावकर यांच्या निवडीमुळे मराठवाड्यातीलच नव्हे तर राज्यातील साखर कारखानदारीला चांगले दिवस येतील असे बोलले जात आहे. 

कारखान्यांचे प्रश्न शासनाकडे मांडणार  

राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे कारखानदारी अडचणीत आहे. तर मागील चार वर्षापासून साखरेचे उत्पादन व विक्रीच्या दराचा मेळ बसविण्यात आला नाही. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असून साखर कारखान्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील.
- जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष राज्य साखर संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com