परभणीचे माजी खासदार तुकाराम रेंगे यांची आँनलाईन फसवणूक

file photo
file photo

परभणी ः मोबाईलचे सीमकार्ड रिचार्ज करण्याकरिता अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड केल्यानंतर काही क्षणातच बँक खात्यातून ४९ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा खळबळजनक प्रकार माजी खासदार अ‍ॅड. तुकाराम रेंगे यांच्याबरोबर घडला. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. नऊ) रात्री गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

माजी खासदार अ‍ॅड. तुकाराम रेंगे पाटील यांना मंगळवारी (ता. नऊ) एक संदेश आला. त्याव्दारे तुमच्या दोन्ही मोबाईलचे सीमकार्ड बंद पडले आहेत. त्यामुळे ते पुन्हा कार्यान्वित करा, असा मॅसेज आला. अ‍ॅड. श्री. रेंगे यांनी लगेच सीमकार्ड रिचार्ज करण्याकरिता सोपान फाळके यांना पाठवले. त्याचवेळी अज्ञात व्यक्तीने मोबाईल करीत दोन्ही सीमकार्ड लागलीच चालू करण्यासाठी केवळ दहा रुपयांचे रिचार्ज करावे लागेल, असे स्पष्ट केले. त्यासाठी एक अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड करुन घ्यावे लागेल, अशीही पुष्टी जोडली. 

त्यामुळे अ‍ॅड. रेंगे यांनी ती सूचना सोपान फाळके यांना सांगितली. तेव्हा सोपान पाळके यांनी सूचनेप्रमाणे अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड केले. दहा रुपयांचे रिचार्ज करण्यासाठी त्यांनी एसबीआयच्या डेबिटकार्डचा वापर केला. तेव्हा काही क्षणातच सोपान फाळके यांच्या स्टेट बँकेच्या खात्यावरुन ४९ हजार रुपये काढून घेतले असल्याचा मॅसेज आला. या मॅसेजने अ‍ॅड. रेंगे यांना धक्काच बसला. आपली शुध्द फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याबरोबर नानलपेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com