माजी सैनिकाने जपले सामाजिक दायित्व

mudhkhed.jpg
mudhkhed.jpg


मुदखेड, (जि.नांदेड) ः शहरातील एका माजी सैनिकाने आपल्या कुटुंबासोबत परिसरातील तीनशे गरीब कुटुंबांना धान्याचे वाटप करून सामाजिक दायित्व जपले आहे. कोविड - १९ कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र संचारबंदी लागू आहे. त्यामुळे मोलमजुरी करून आपल्या कुंटुबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अनेकांना कठीण समस्यांचा सामना करावा लागत आहे. आपल्या भागातील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांची अन्नधान्यावाचून गैरसोय होऊ नये, या करिता शहरातील माजी सैनिक तथा पाविकेतील माजी उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांनी सामाजिक दायित्व जपत जवळपास ३०० कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप केले.

पेन्शनमधून अन्नधान्याचा पुरवठा ​
शहरातील धनगर टेकडी, मनूरवार गल्ली, मराठा गल्ली या भागातील गरजू गोरगरीब कुंटुबीयांना नगरसेवक लक्ष्मणराव देवदे यांनी स्वतःच्या माजी सैनिक म्हणून मिळणाऱ्या पेन्शनमधून अन्नधान्याचा पुरवठा केला. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर येथे अत्यंत शिस्तीमध्ये त्यांनी गरजू कुंटुबीयांना अन्नधान्याचे वाटप केले. देवदे यांच्या मदतीने अनेक वृद्ध निराधार महिला या भारावून गेल्या असल्याचे दिसून आले. दरम्यान, माजी सैनिक देवदे यांनी सामाजिक जाणिवेच्या भूमिकेतून हाती घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमांचे शहरवासीयांतून काैतुक गेल्या जात आहे. यापूर्वीदेखील सामाजिक जाणिवेच्या भूमिकेतून माजी सैनिक लक्ष्मणराव देवदे यांनी अनेकांना मदत केली आहे. या पुढेदेखील आवश्यकतेनुसार प्रसंगानुरूप गरजूंना आपल्या परीने मदत केल्या जाईल, अशी ग्वाहीही या निमित्ताने बोलताना माजी सैनिक लक्ष्मणराव देवदे यांनी दिली.


मागील आठवड्यापासून शहर लॉकडाउन असून पोलिस प्रशासन यासाठी मोठे प्रयत्न करीत आहे. दरम्यान, शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, रेल्वेगेट व गुजरी चौक परिसरात काही नागरिकांकडून लॉकडाउन दरम्यान फिरत असून पोलिस प्रशासनाची मोठी दमछाक होत आहे. लॉकडाउन दरम्यान प्रशासनास मदत करावे, असे आवाहनदेखीन पोलिस निरीक्षक विश्वांभर पल्लेवाड यांनी केले आहे. दरम्यान, माजी सैनिक देवदे यांनी राबविलेल्या उपक्रमास या वेळी गोरगरीब जनतेपर्यंत हे उपलब्ध अन्नधान्य या भागातील युवा कार्यकर्ते उपेंद्र देवदे, मारोती कमजळे, पिंटू गुंठे, भगवान देवदे यांच्यासह अनेक युवकांनी घरोघरी पोचविण्याचे काम केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com