esakal | घरफोडीतील आरोपी चार तासांत जेरबंद, मुद्देमालही हस्तगत
sakal

बोलून बातमी शोधा

3crime_201_163

बीड  तालुक्यातील चौसाळा येथील कृषी दुकान फोडून पावणेतीन लाख रुपये चोरी प्रकरणाचा तपास चार तासांत लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

घरफोडीतील आरोपी चार तासांत जेरबंद, मुद्देमालही हस्तगत

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : तालुक्यातील चौसाळा येथील कृषी दुकान फोडून पावणेतीन लाख रुपये चोरी प्रकरणाचा तपास चार तासांत लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी आरेापीला जेरबंद करून त्याच्याकडून चोरीतील रोकडही हस्तगत केली. अशोक दिलीप कळसकर असे संशयित आरोपीचे नाव आहे.


शशिकांत राजेंद्र खोड (रा. जानकापूर, ता. वाशी) यांचे चौसाळा येथे जगदंब कृषी सेवा केंद्र दुकान आहे. रविवार-सोमवारच्या मध्यरात्री चोरट्याने पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील टेबलचे ड्रॉवर उघडून रोख दोन लाख ७० हजार रुपये लंपास केले. याबाबत सोमवारी श्री. खोड यांनी नेकनूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी अशोक कळसकर याच्यावर चोरीचा संशय व्यक्त केला. गुन्ह्यानंतर संशयित फरारही होता. दरम्यान, पथकाने त्याचा कळंब, ढोकी या भागात शोध घेऊन ताब्यात घेतले. सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

खून प्रकरणी तिघांना जन्मठेप 

मात्र, पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. चेारीतील दोन लाख ७० हजार रुपयांपैकी त्याने दोन लाख ६१ हजार ५०० रुपये पोलिसांच्या हवाली केले. संशयित आरोपीकडून घरफोडीची इतर गुन्हेही उघड होण्याची शक्यता आहे. गुन्हा उघड करण्याच्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, फौजदार विलास जाधव, फौजदार गोविंद एकिलवाले, श्रीमंत उबाळे, तुळशीराम जगताप, मनोज वाघ, सखाराम पवार, राहुल शिंदे, श्री. जाधव, बाबासाहेब डोंगरे, अशोक गव्हाणे, श्री. जायभाये, श्री. घोलप, श्री. चव्हाण, श्री. शेंडगे यांचा सहभाग होता.

Edited - Ganesh Pitekar