सराफाला साडेचौदा लाखाचा गंडा

प्रल्हाद कांबळे
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

नांदेड : सोन्याचे दागिणे तयार करून देण्यासाठी दिलेले साडेचौदा लाखाचे ३७१ ग्राम वजनाचे सोने कारागिराने पळविले. या प्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १६) रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : सोन्याचे दागिणे तयार करून देण्यासाठी दिलेले साडेचौदा लाखाचे ३७१ ग्राम वजनाचे सोने कारागिराने पळविले. या प्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १६) रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सराफा बाजार आहे. या बाजारात सोन्याचे दागिणे तयार करण्यासाठी खास करून पश्‍चिम बंगालमधून कारागीर बोलाविल्या जातात. त्यांच्याकडूनच सोन्याचे तयार दागिणे करून सराफा व्यापारी आपले दुकान सजवतो. ग्राहकांच्या पसंतीला उतरतील असे आकर्षक व सुंदर दागिणे हे कारागिर करीत असतात. त्यामुळे अशा कारागिरांवर विश्वास ठेऊन सराफा व्यापारी सोने त्यांच्या स्वाधीन करतो. 
मात्र न्यु व्यकंटेश्‍वरा ज्वेलर्सचे सराफा दिलीप विठ्ठलराव पेन्शलवार यांना चक्क १४ लाख ४६ हजाराचा फटका बसला.

त्याचे झाले असे की, श्री. पेन्शलवार यांनी कारागिर महेमुद मलिक रा. मारोखान ता. खानाकुल जिल्हा हुबळी (पश्चिम बंगाल) ह. मु. किल्ला रोड, नांदेड याच्याकडे दागिणे तयार करण्यासाठी ता. २५ सप्टेंबर २०१९ रोजी ३७० ग्राम ७७० मिली वजनाचे (साडेचौदा लाख) सोने दिले. परंतु या सोन्याचे दागिने न बनवता कारागिर हा दिलेले सोने घेऊन पसार झाला. दागिणे आज देईल, उद्या देईल या आशेवर बसलेल्या पेन्शलवार यांना तो पसार झाल्याचे समजताच त्यांना चांगलाच झटका बसला. त्यांनी त्याच्याशी खूप संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो संपर्कात आला नाही. शेवटी श्री. पेन्शलवार यांनी शनिवारी (ता. १६) इतवारा पोलिस ठाण्यात वरिल कारागिराविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास  सहाय्यक पोलिस निरीक्षक फिरोजखान पठाण करित आहेत. 

 

हे ही वाचा 
महिलांना स्वावलंबी करणार
आस्मिता फाउंडेशनचा उपक्रम

नांदेड : अस्मिता फाऊंडेशनच्या वतीने बळीरामपूर (ता. नांदेड) बी-२/ १३ येथे महिलांना स्वावलंबन करण्यासाठी एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात शनिवारी (ता. १६) घेण्यात आली. यावेळी या कार्यशाळेला प्रा. सारिका बच्चेवार यांनी मार्गदर्शन केले. 

समाजातील अनेक महिलांना आपल्या कुटुंबाला आर्थीक मदत मिळावी यासाठी सतत प्रयत्न करावेसे वाटतात. परंतु त्यांच्या सुप्त गुणांना अनेकवेळा वाव मिळत नाही. अशा महिलांसाठी आता अस्मिता फाऊंडेशन काम करणार आहे. या फाऊंडेशनच्या प्रा. बच्चेवार यांनी हे पाऊल उचलले असून त्यांनी पहिला प्रयोग बळीरामपूर (ता. नांदेड) येथे एक दिवशीय कार्यशाळा घेऊन सुरू केला आहे. या कार्यशाळेत चंद्रकला चापलकर, रिना गायकवाड, चंदा गच्चे यांचेही सहकार्य लाभले.

या कार्यशाळेत रिझवाना शेख लायक अली, मिना घोंगडे, कल्पना शिंदे, रुक्साना शेख आयुब, परवीन शेख खाजा, जरिना बेगम सय्यद हुसेन, आश्विनी सरपते, संध्या जाधव, दिप्ती सांगवीकर यांच्या समवेत मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांसाठी सेनेटरी नेपकीन तयार करण्याचे मोफत प्रशिक्षण स्मिता कुलकर्णी यांनी देऊन महिलांना स्वावलंबी करण्यासाठी लघू उद्योग उभारण्याचा सल्ला दिला.

 फाऊंडेशनचे आवाहन

शहर व जिल्ह्यातील  ठिकाणच्या महिला स्वंयरोजगार किंवा  उद्योगासाठी पुढे येत असतील तर अस्मिता फाऊंडेशन त्यांच्या सोबत राहील असा विश्वास प्रा. सारिका बच्चेवार यांनी व्यक्त केला आहे. 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four and a half lakh bales to the bank

फोटो गॅलरी