साडेचार लाखांची रक्कम लुबाडल्याचा रचला बनाव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - महावितरण कंपनीने कंत्राट दिलेल्या बील भरणा केंद्रातील साडेचार लाख रुपयांची रक्कम लंपास झाली. दरम्यान, दोन व्यक्तींनी आपल्याला लुबाडले, असे बनाव या केंद्रातील कर्मचाऱ्याने करत तक्रार दिली. पण, पोलिसांनी केलेल्या उलट तपासणीत त्यानेच ही रक्कम लाटण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. या प्रकरणात त्याला मंगळवारी (ता. 31) अटक झाली. 

औरंगाबाद - महावितरण कंपनीने कंत्राट दिलेल्या बील भरणा केंद्रातील साडेचार लाख रुपयांची रक्कम लंपास झाली. दरम्यान, दोन व्यक्तींनी आपल्याला लुबाडले, असे बनाव या केंद्रातील कर्मचाऱ्याने करत तक्रार दिली. पण, पोलिसांनी केलेल्या उलट तपासणीत त्यानेच ही रक्कम लाटण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. या प्रकरणात त्याला मंगळवारी (ता. 31) अटक झाली. 

सोमनाथ मुरलीधर शेटे (वय 27) हा मूळ चिखली, जि. बुलडाणा येथील असून, तो कामानिमित्त गत काही दिवसांपासून शहरात राहतो. महावितरणने कंत्राट दिलेल्या बील भरणा केंद्रात तो कामाला असून, बिलाची रक्कम गोळा करण्याचे काम त्याच्याकडे आहे. दोन दिवसांची गोळा केलेली चार लाख 59 हजारांची रक्कम त्याने घरी ठेवली. त्यानंतर खोटा बनाव रचत सांगितले, ""आपण रक्कम बॅगेत भरून सोमवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास सिडकोतील कॅनॉट प्लेसस्थित एचडीएफसी बॅंकेत भरणा करण्यासाठी नेली. फोन आल्याने कॅनॉट येथील रस्त्यावर दुचाकी उभी करून बोलत असताना पंचवीस ते तीस वयोगटांतील दोघे दुचाकीने मागून आले. मागे बसलेल्याने दुचाकीवर ठेवलेली पैशांची काळी बॅग हिसकावून पसार झाले'', असे शेटे याने सांगितले. हा प्रकार ऐकून पोलिसही अवाक्‌ झाले. त्यानंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पण, प्रकरणातच आलबेल असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी त्याचीच उलट तपासणी केली. त्यावेळी पैसे हडपण्यासाठीच बनाव रचल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडून तीन लाख 67 हजार रुपये जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी दिली. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. दरम्यान, त्याला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रजापती, सहायक निरीक्षक परजणे, ठुबे, हवालदार जरारे, पोलिस नाईक संतोष मुदिराज, भिसे, गाढे, इरफान खान, मानकापे, पुंगळे, खैरनार, उकिर्डे, भानुसे यांनी केली. 

सीसीटीव्ही फुटेज तपासले 
सोमनाथ शेटेने सांगितलेल्या बाबी पोलिसांनी पडताळल्या. तो आलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पण, यात काहीच चित्रित झाले नव्हते. त्याचे मोबाईल लोकेशनही तपासले असता, त्याने सांगितलेला मार्ग व मोबाईल लोकेशनमध्ये तफावत आढळली. त्याच्या बोलण्यातील विरोधाभासावरूनच त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. 

Web Title: four and a half million amount of framed fabric strip