लातूर जिल्ह्यातील चार पालिकांसाठी आज मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

लातूर - जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर, औसा व निलंगा नगरपालिकांसाठी बुधवारी (ता. 14) मतदान होणार आहे. या चार पालिकांत 101 नगरसेवकांच्या जागांसाठी 501 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, नगराध्यक्षपदांच्या चार जागांसाठी 38 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. चार ठिकाणच्या 203 केंद्रांवर दीड लाख उमेदवार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

औसा येथे नगराध्यक्षपदासाठी 13 उमेदवार रिंगणात आहेत तर नगरसेवकाच्या 20 जागांसाठी 101 उमेदवार आहेत. निलंगा येथे नगराध्यक्षपदासाठी सहा तर 20 नगरसेवकपदांसाठी 100 उमेदवार आहेत. अहमदपूर येथे 23 नगरसेवकपदांच्या जागांसाठी 115 तर नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार आहेत. उदगीर येथे नगरसेवकांच्या 38 जागांसाठी 185 तर नगराध्यक्षपदासाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, नगरसेवकांसह नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची माहिती मतदान केंद्राबाहेर लावण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Four corporations today voted to Latur