कार टँकरवर धडकली, वंचितच्या लातूर जिल्हाध्यक्षांसह तिघे ठार

वैजिनाथ जाधव
Thursday, 26 November 2020

चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार टँकरवर धडकून झालेल्या अपघातात लातूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांसह तिघे ठार, तर एक जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता.२६) येथील बाह्यवळण रस्त्यावर सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घडली.

गेवराई (जि.बीड) : चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार टँकरवर धडकून झालेल्या अपघातात लातूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांसह तिघे ठार, तर एक जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता.२६) येथील बाह्यवळण रस्त्यावर सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घडली. सदाशिव भिंगे (लातूर जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), संतोष भिंगे, सुभाष भिंगे व महादेव सकटे अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

लातूर येथील भिंगे कुटुंबीय राम भिंगे यांच्या मुलीला मुलगा पाहण्यासाठी कारमधून औरंगाबादला निघाले होते. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेवराई येथील बाह्यवळण रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने कार मागच्या उजव्या बाजूने टँकरवर जाऊन जोरात धडकली. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले. तर अन्य दोघे जणांचा उपचारादरम्यान जागीच मृत्यू झाला मृतामध्ये लातूर येथील वंचितचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे, प्रा. सुभाष भिंगे, महादेव सकटे व संतोष भिंगे यांचा समावेश असून राम भिंगे गंभीर जखमी आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Dies In Car-Tankar Accident Gevrai Beed News