चार शेतकऱ्यांनी दिला शेतातून रस्ता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

माजलगाव - अनेक शेतकरी तलाव, रस्ते आणि इतर शासकीय कामांसाठी आपली जमीन देण्यास नकार देतात. मात्र, येथील चार शेतकऱ्यांनी ग्रामदैवत असणाऱ्या मारुती मंदिरासाठी आपल्या शेतातून विनामोबदला रस्ता दिला. त्यामुळे भाविकांची गैरसोय टळली असून, या रस्त्याच्या कामासाठी आमदार आर. टी. देशमुख यांनी तत्काळ आठ लाख रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला आहे.

सिंदफणा नदीपलीकडे असलेले दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर शहरवासीयांचे ग्रामदैवत आहे. मात्र, नदीपात्रात असलेल्या पाण्यामुळे भाविकांना मंदिरात जाण्यास अडचणीचे ठरत होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग २२२ जवळ शेती असलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक मच्छिंद्र काळे, डॉ. सचिन देशमुख, गौतम टाकणखार आणि दादाराव टाकणखार यांनी आपल्या जमिनीतून पंचवीस फूट रुंद आणि दोन किलोमीटर लांबीचा रस्ता दिला. त्यामुळे भाविकांची गैरसोय टळली असून, या रस्त्यासाठी आमदार देशमुख यांनी तत्काळ आठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या चौघांच्या निर्णयामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचीही सोय झाली आहे. आपल्या शेतातील मालाची ने-आण करण्यासाठी त्यांना जवळचा आणि मोठा रस्ता मिळाला आहे.

स्वखर्चाने रस्ताही करून दिला 
दर्शनासाठी भाविकांची होणारी गैरसोय पाहता शिवसेनेचे माजी नगरसेवक श्री. काळे यांनी स्वत:च्या शेतजमिनीतून रस्ता देण्याचा निर्णय घेतला. शिवाय डॉ. सचिन देशमुख, गौतम टाकणखार आणि दादाराव टाकणखार या शेतकऱ्यांनाही रस्ता देण्यास विनंती केली. त्यावर त्या तिघांनीही तत्काळ रस्त्यासाठी आपली जमीन उपलब्ध करून दिली. एवढेच नाही, तर या सर्वांनी मिळून स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने रस्ताही तयार केला.

Web Title: Four farmers gave way to the field