चार शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - बीड, नांदेड, परभणी जिल्ह्यांतील चार शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपविले. त्यात एका शेतकरी महिलेचाही समावेश आहे.

कर्जबाजारीपणाला कंटाळून आष्टी शहराजवळील गर्जेवस्तीतील शेतकरी अनंत हनुमंत कारंडे (वय ६५) यांनी मंगळवारी (ता. १३) दुपारी चारच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. आष्टी पोलिसांनी पंचनामा केला. आष्टी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेतकरी महिलेचे विषप्राशन

शेतकरी राधाबाई खांडेकर (रा. डोंगरगाव. ता. गंगाखेड) यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.१३) सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. नापिकीमुळे काढलेले कर्ज कसे फेडावे, घरखर्च कसा भागवावा, मुलीचा विवाह कसा करावा या विवंचनेत त्यांनी पहाटे पाचच्या सुमारास कीटकनाशक घेतले. पती रामचंद्र खांडेकर शेतातून घरी आल्यानंतर त्यांना राधाबाई उलट्या करत असल्याचे दिसले. त्यांना गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान राधाबाई यांचा मृत्यू झाला. येथील पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली.

साेमठाण्यात घेतला गळफास

सोमठाणा (ता. नायगाव) येथील शेतकरी अंबादास दत्तराम कदम (वय ३५) यांनी सोमवारी (ता. १२) सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. सततच्या नापिकीमुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत होती. त्यामुळे त्यांनी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले. यंदाच्या हंगामात कर्जाची परतफेड करता येईल, या आशेने त्यांनी पुन्हा कर्ज काढून पेरणी केली. पावसाने दगा दिल्याने हाती आलेला हंगाम गेल्याने ते बेचैन असत. त्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. कुंटूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

चिंचगव्हाणला घटना

माजलगाव शहरानजीकच्या चिंचगव्हाण येथील दगडू नारायण शिंदे (वय ३५) यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. त्यांच्या मागे पत्नी, चार मुले असा परिवार आहे.

Web Title: Four farmers have committed suicide