अहमदपूरमध्ये भरवस्तीत चार लाख रुपयांची बॅग चोरट्यांनी पळवली

गुन्हे
गुन्हे

अहमदपूर (जि.लातूर) : शहरातील (Ahmedpur) भरवस्तीतून चार लाख तीस हजार रुपयांची बॅग अज्ञात व्यक्तींनी लंपास केल्याची घटना घडली आहे. शहरातील व्यापारी शरद जोशी यांचे आझाद चौक येथे अजिंक्य या नावाने खासगी एटीएम असल्याने त्यांचा दररोज भारतीय स्टेट बँकेत पैसे काढणे व भरणे असा (Crime In Latur) व्यवहार चालतो. त्यांच्याकडे पैशाचा व्यवहार पाहणारे शरीफ शेख यांनी गुरूवारी (ता.पाच) नियमितपणे दुपारी बाराच्या आसपास भारतीय स्टेट बँकेतून (State Bank Of India) जोशी यांच्या खासगी एटीएममध्ये भरण्यासाठी चार लाख तीस हजार रूपये काढले व बॅगेत ही रक्कम ठेवून ते बँकेतून निघाले. बॅंकेपासून चारशे ते पाचशे फूट अंतरावर पोहोचले असता क्रमांक नसलेल्या मोटारसायकलवरून मास्क लावलेल्या दोन अज्ञात व्यक्ती पाठीमागून आल्या.

गुन्हे
PSI होण्याचे स्वप्न अधुरे, विद्यार्थ्याचा हृदयविकाराने निधन

मागे बसलेल्या व्यक्तीने पैशांची बॅग काढली व ते मोटारसायकलस्वार फरार झाले. या संदर्भात अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद प्रक्रिया सुरु असून पुढील तपास चालू आहे. भारतीय स्टेट बँक ही भर वस्तीत आहे. शहरातील जवळपास तीनशे व्यापाऱ्यांचे दैनंदिन व्यवहार या बँकेत चालतात. भरदिवसा व भर वस्तीत घडलेल्या घटनेने व्यापाऱ्यांची चिंता वाढवली आहे.

अजून तपास नाही..

सहा महिन्यांपूर्वी पुरोहित पेट्रोलियमचे मालक पवन पुरोहित यांच्या माहेर भांडी स्टोअर या दुकानाचे एक शटर उघडून गल्ल्यात तीन लाख सव्वीस हजार ठेवून दुसरे शटर उघडतानाच गल्ल्यातील रक्कम घेऊन चोरट्यांनी धूम ठोकली होती. त्याची अद्यापही तपास झालेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com