चार लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी केली लंपास

चार लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी केली लंपास

नांदेड : शहरात दुचाकीवरून येऊन मोबाईल, पर्स, गळ्यातील सोनसाखळी अशा जबरी चोरीच्या घटना घडत असतानाच, पुन्हा एकाला रस्त्यात दोघांनी अडवून त्याच्याजवळील तीन लाख 90 हजार रुपये असलेली बॅग जबरीने चोरून नेली. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहराच्या नमस्कार चौक परिसरात राहणारा करण बळीराम सुर्यवंशी (वय २१) हा आनंदनगर भागातील साई ट्रॅव्हल्सवर वसुलीचे काम करतो. त्याने सोमवारी (ता. १९) रात्री आठच्या सुमारास आनंदनगर कार्यालयातील काही पैसे सोबत घेऊन देगलूर नाका येथील कार्यालयातून एक लाख 30 हजार रुपये घेतले. तीन लाख 90 हजार रुपये नेहमीप्रमाणे बँकेत जमा करण्यासाठी तो परत आनंदनगर कार्यालयाकडे येत होता.

बाफना ब्रिजवर येताच पाठीमागून एका दुचाकीवरून तोंडाला पट्टी बांधून वाहनक्रमांक नसलेल्या वाहनावरून दोन चोरटे आले. त्यानंतर त्याची दुचाकी अडवून त्याला मारहाण केली. विशेष म्हणजे या पुलावर अंधार होता आणि सीसीटीव्ही फुटेजही नसल्याने चोरट्याचा चेहरा त्याला ओळखता आला नाही. जबरीने त्याच्याजवळील तीन लाख ९० हजारांची बॅग लंपास केली. घटना घडल्यानंतर त्यानी मालकांला संपर्क साधून रात्रीच शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले.

पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, फौजदार बोनवाड, गोपीनाथ वाघमारे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र, या भागात सर्वत्र अंधार असल्याने पोलिसांनाही घटनास्थळावर काहीही सापडले नाही. करण बळीराम सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन अनोळखी दोघांविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास बोनवाड करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com