महापालिकेच्या चार शाळांमध्ये सेल्फीद्वारे हजेरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

औरंगाबाद - महापालिकेच्या चार शाळांमध्ये सेल्फीद्वारे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा हजेरीपट नोंदला. सेल्फीमुळे आता शिक्षकांना हजर विद्यार्थ्यांची नव्हे, तर गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद घ्यावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांची गैरहजेरी एका क्‍लिकमध्ये संकेतस्थळावर अपलोड होणार आहे. यामुळे शिक्षकांचा हजेरीपट भरत बसण्याचा आणि वर्गात गेल्याबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव उच्चारण्याचा, तर विद्यार्थ्यांचा यस सर, यस सर म्हणून उठून बसण्याचा त्रास कमी होणार आहे. महापालिकेच्या शाळेमध्ये या मोबाईलवरून सेल्फीद्वारे ऑनलाइन हजेरी नोंदण्याच्या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले. 

तंत्रज्ञानावर सर्वत्र भर दिला जात असताना आता शैक्षणिक क्षेत्रातही नवीन तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्याची सक्‍ती करण्यात आली आहे. हजेरीपटावर खोट्या पटसंख्येला आळा घालण्यासाठी उपस्थिती नावाच्या ॲप्लिकेशनचा वापर करण्याची सक्ती केली जात आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षक या योजनेच्या विरोधात गेलेले असले, तरी महापालिकेतील शिक्षकांनी मात्र याचे स्वागत केले असल्याचे चित्र आहे.

महापालिकेच्या ७० शाळांच्या ११ केंद्रांमध्ये संबंधित केंद्रातील मुख्यध्यापकांची सेल्फी योजनेची माहिती व ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घेण्यासंदर्भात बैठक झाली. प्रत्येक केंद्रातील एक ते तीन मुख्यध्यापकांकडे अत्याधुनिक थ्रीजी अँड्रॉईड मोबाईल नसल्यामुळे त्यांचा अपवाद वगळता सोमवारी (ता. नऊ) सुमारे ९० टक्के मुख्याध्यापकांनी सरल प्रणालीअंतर्गत उपस्थिती नावाचे ॲप डाऊनलोड करून घेतले.

मुख्यध्यापक आता आपल्या शाळेतील प्रत्येक वर्गशिक्षक आणि शिक्षकांना हे ॲप डाऊनलोड करायला सांगणार आहेत. मुख्याध्यापकाला त्याच्या शाळेतील सर्वच वर्गांच्या उपस्थितीचे हजेरीपट ओपन होणार असले, तरी वर्गशिक्षकाला मात्र त्याच्या वर्गाचाच हजेरीपट ओपन होणार आहे.

वर्गशिक्षकांच्या ॲपमधील त्याच्या हजेरीपटात फक्त त्याच्या वर्गातील विद्यार्थ्यांची नावे असतील. यातील उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षकाने काहीही नोंद करायची नाही; मात्र जे विद्यार्थी गैरहजर आहेत त्यांची मात्र वर्गशिक्षकाने कळ दाबून नोंद करायची आहे. त्यानंतर त्याने ही माहिती एका क्‍लिकद्वारे मुख्यध्यापकाकडे, तर मुख्याध्यापकाने संबंधित संकेतस्थळावर पाठवायची आहे. अशा प्रकारे गैरहजर विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर जमा होत जाणार आहे. सोमवारी हर्सूल, इंदिरानगर, बायजीपुरा, एन- १२ आणि बेगमपुरा येथील महापालिका शाळांत सेल्फीद्वारे हजेरी नोंदविण्यात आली.

Web Title: Four municipal schools selfy presenty