चार नवे रुग्ण : दोन संपर्कातील; दोघे बाहेरून आलेले, दोन बीडमधील; भाटुंबाचे दो औरंगाबाद रिटर्न 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

अंबाजोगाईच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत करण्यात आली. यात १५५ सॅब नमुने निगेटीव्ह, तर चार पॉझिटीव्ह आढळल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.

बीड - मधल्या काळात थंडावलेले कोरोना मीटर पुन्हा सुरू झाले आहे. गुरुवारीही (ता. दोन) चार नवे रुग्ण आढळले आहेत. यात बीड शहरातील दोन व भाटुंबा (ता. केज) येथील दोघांचा समावेश आहे. भाटुंबाचे रुग्ण औरंगाबादहून आलेले असून शहरातील दोघांना जुन्या रुग्णांच्या संपर्कातून बाधा झाल्याचा अंदाज आहे. शहरात संपर्कातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरात लॉकडाऊनचा निर्णय योग्यच असल्यावर शिक्कामोर्तब झाले. 

गुरुवारी जिल्हा रुग्णालय, बीडचे कोविड केअर सेंटर, आष्टीचे ग्रामीण रुग्णालय, केजचे उपजिल्हा रुग्णालय, परळीचे उपजिल्हा रुग्णालय, गेवराईचे उपजिल्हा रुग्णालय, माजलगावचे ग्रामीण रुग्णालय तसेच अंबाजोगाईचे स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व तेथीलच कोविड केअर सेंटर आदी ठिकाणांहून १५९ लोकांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. याची तपासणी अंबाजोगाईच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत करण्यात आली. यात १५५ सॅब नमुने निगेटीव्ह, तर चार पॉझिटीव्ह आढळल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.

हेही वाचा - शेतकऱ्याकडून लाच मागितली, बीड जिल्ह्यात तिघा  बँक कर्मचाऱ्यांवर गुन्हा

आढळलेल्या रुग्णांत असेफनगर भागातील ३७ वर्षीय पुरुष व अजिजपुरा भागातील ४४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर, भाटुंबा (ता. केज) येथील ३० वर्षीय स्त्री व ३८ वर्षीय पुरुषाचा कोरोनाग्रस्तांमध्ये समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या १३५ झाली असून उपचारानंतर ११५ रुग्ण बरे झाले आहेत. सहा जणांचा मृत्यू झाला असून १४ जणांवर उपचार सुरू आहेत. 

संपर्क साखळी सुरूच 
शहरात यापूर्वी आढळलेले रुग्ण हे बाहेर जिल्ह्यातून आलेले होते. मात्र, नंतर मधल्या काळात आढळत असलेले रुग्ण हे कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील आहेत. संपर्कातील साखळी सुरूच असल्याने शहर लॉकडाऊन करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे यावरून दिसते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four new patients: two in contact; Two from the outside, two from the bead; Bhatumba's two Aurangabad returns

Tags
टॉपिकस
Topic Tags: