जिल्हा परिषदेच्या ३६ कर्मचाऱ्यांची अँटीजेन तपासणीत चार जण पॉझिटिव्ह

राजेश दारव्हेकर | Wednesday, 2 September 2020

जिल्हा परिषदेचे अर्थ विभागातील कर्मचारी बालाजी बांगर व महिला व बालकल्याण विभागातील कक्ष अधिकारी डी. एस. जाधव यांचा कोरोना अहवाल सोमवारी  पॉझिटिव्ह आल्याने हे दोन्ही विभाग आरोग्य विभागाच्या वतीने शील केले असून सानिटाईझ केले होते

हिंगोली :  येथील जिल्हा परिषदेच्या अर्थ व महिला बालकल्याण विभागातील दोन्ही मिळून मंगळवारी (ता. एक) ३६ कर्मचाऱ्यांची अँटीजन टेस्ट केली असता यात पुन्हा चारजण पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांच्यावर सामान्य रुग्णालयातील आयोसोलेशन वॉर्डात उपचार सुरु आहेत.

येथील जिल्हा परिषदेचे अर्थ विभागातील कर्मचारी बालाजी बांगर व महिला व बालकल्याण विभागातील कक्ष अधिकारी डी. एस. जाधव यांचा कोरोना अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने हे दोन्ही विभाग आरोग्य विभागाच्या वतीने शील केले असून सानिटाईझ केले होते. पुन्हा जिल्हा परिषदे मध्ये कोरोना शिरकाव झाल्याने यादोन विभागातील कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने  जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबीनोद शर्मा, यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत कुमार माळी यांनी दोन विभागातील कर्मचाऱ्यांची अँटीजन टेस्ट करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या त्यानुसार सामान्य रुग्णालयातील डॉ. जायभाये  यांच्या पथकाने ३६ कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता यातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्या चार जनांवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

हेही वाचा नांदेड : मंगरूळ येथील सीआरपीएफचे अधिकारी पोचिराम सुद्देवाड यांचा जम्मू काश्मिरात मृत्यू -

पळून गेलेली महिला स्वत: हून क्वरांटाईन

तर यातील एक पॉझिटिव्ह महिला कर्मचारी  पळून गेल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. अखेर त्या महिलेने स्वतःहून क्वारंटाईन झाल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र या महिला कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध पथक व आरोग्य विभागातील कर्मचारी घेत आहेत.

जिल्हा परिषदेतील चार कर्मचारी पाँझीटिव्ह

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी अधिक प्रमाणात वाढत आहेत. यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, आरोग्य विभागातील वरिष्ठ व इतर कर्मचारी देखील कोरोना पाँझीटिव्ह झाले होते. यामुळे काही दिवस या कार्यालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाने अनेक कार्यालयात देखील प्रवेश केल्याने कर्मचाऱ्यांतून भितीचे वातावरण आहे. आता परत एकदा जिल्हा परिषदेतील चार कर्मचारी पाँझीटिव्ह आले आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे