जीप-ट्रक धडकेत चार भाविक ठार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

चौसाळा (ता. बीड) - जीप-ट्रकची समोरासमोर धडक होऊन चार भाविक ठार, तर सात जण गंभीर जखमी झाले. धुळे-सोलापूर महामार्गावरील चौसाळ्यानजीकच्या वाणगाव फाट्याजवळ सोमवारी (ता. 24) पहाटे साडेतीनच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. अपघातातील मृत व जखमी बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. 

चौसाळा (ता. बीड) - जीप-ट्रकची समोरासमोर धडक होऊन चार भाविक ठार, तर सात जण गंभीर जखमी झाले. धुळे-सोलापूर महामार्गावरील चौसाळ्यानजीकच्या वाणगाव फाट्याजवळ सोमवारी (ता. 24) पहाटे साडेतीनच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. अपघातातील मृत व जखमी बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. 

मृतांची नावे ः जया चोपाळे (वय 45), अक्षदा संजय चौधरी (16), प्रदीप निनाजी खर्चे (25), दिनेश निवृत्ती खर्चे (65, सर्व शेलगाव बाजार, ता. मोहताळा, जि. बुलडाणा). जखमींची नावे ः वैशाली रवींद्र खर्चे (32), रूपाली प्रदीप खर्चे (21), प्रकाश भास्कर खर्चे (55), रणजित दिनेश खर्चे (20), मंदाकिनी खर्चे, जीपचालक अविनाश सपकाळ, धनराज बाबूराव पाटील. 

बुलडाण्याचे माजी आमदार राजेंद्र घोडे यांच्या पुण्यतिथिनिमित्त कार्यकर्त्यांनी मतदारसंघातील भाविकांसाठी पंढरपूर दर्शनचे आयोजन केले होते. त्यानुसार भाविकांना घेऊन दोन जीप (क्रूझर) रविवारी (ता. 23) सायंकाळी शेलगाव बाजार येथून पंढरपूरकडे निघाल्या होत्या. धुळे - सोलापूर महामार्गावरील चौसाळ्याजवळच्या वाणगाव फाट्यावर पहाटे साडेतीनच्या दरम्यान जीप (एमएच-28-सी 2353) आली असता सोलापूरहून औरंगाबादकडे निघालेल्या भरधाव ट्रकची (एपी 29 - व्ही 2001) समोरासमोर धडक झाली. त्यात जीपचा समोरील भाग दबला गेला, तर एक भाग कापला गेला. दुसऱ्या जीपमधील भाविक व ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले. पाच जखमींना बीड शासकीय रुग्णालयात, तर अन्य दोन जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. मांजरसुंबा, नेकनूर पोलिसांनी पंचनामा केला. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तो फरारी आहे. 

दरम्यान, सोलापूर-धुळे महामार्गाचे सध्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. जागोजागी अनेक अडथळे असल्याने अपघांचे प्रमाण वाढत आहे. 

Web Title: Four people killed in Jeep-truck crash