बीडजवळ अपघातात 4 जण ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

क्रुजरमधील सर्वजण पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात होते. मृतांमध्ये 2 महिला व 2 पुरुषांचा समावेश आहे.

बीड - बीडजवळील मांजरसुंबा घाट संपताच आज (सोमवार) पहाटे क्रुजर गाडी आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच ठार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान क्रुजर गाडी आणि ट्रकची धडक झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी आहेत. जखमींना बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

क्रुजरमधील सर्वजण पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात होते. मृतांमध्ये 2 महिला व 2 पुरुषांचा समावेश आहे.

Web Title: Four people were killed in an accident near Beed